पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (४७) महाशोक आरंभिला त्या कपीने । म्हणे काय केले जगज्जननीनें ॥ ३९ ॥ बहू दुःख मागील तें आठविले । उदासीन हे चित्त दुश्चीत जाले ॥ म्हणे काय सांगो तया राघवाला । कपी मारुती शोकसिंधू बुडाला ॥ १० ॥ म्हणे रे कपाळा असे काय केले । बहू थोर हे पाप माझे उदेलें ॥ न सांगो तरी गोष्टी राहों नये की । पुढे सांगतां राघवा दुःख हे की ॥ ११ ॥ प्रवाहो बळे चालिला अश्रुपातीं । विलापे करूं लागला तो रुदंती ॥ बळे ऊठला चालतां चालवेना । रघूनायका भेटला दैन्यवाणा ।। ४२ ॥ अधोमुख पाहोनि कांहीं वदेना । दुखे दाटला कंठ त्या बोलवेना ॥ म्हणे जानकीसारिखी शस्त्रघाते । रणी मारिली राक्षसे इंद्रजीतें ॥ ४३ ।। तये सांगतां मांडला शोक राम । मिळाली दळे दैन्यवाणी विराम || फपीवाहिनामाजि आकांत जाला सुमित्रासुते राम तो शांत केला ।। १४ ॥ भविष्योत्तरें वाल्मिकी सत्य व्हावी । दहसोंगसंपादणी का करावी ॥ म्हणूनी रघुनायके शोक केला । तंव बीर बीभीषणू शीघ्र आला ॥ १५॥ म्हणे जी प्रभू शोक वांयां करीतां । असे सत्य नेमस्त कल्याण सीता ।। अशोकावना दूत म्यां पाठविले । प्रसंगी समाचार घेऊनि आले ॥ १६ ॥ तया इंद्र जीतें रणी भाव केली । नव्हे सत्य हे मिथ्य होऊनि गेली ॥ पुरी होम आरंभिला मेघनादें । पुरा जालिया कोण घेईल "वंदें ।। ४७ ॥ तया इंद्रजीतासी आधी वधावे । वृथा शोक सांडूनियां सिद्ध व्हावें । परा होम हो जालिया आवरेना । समारंगणी मारितां ही मरेना ॥ १८ ॥ प्रभ जाहली श्रिणी व्योमपंथे । वधावा सुमित्रासुताचनि हातें ॥ तये सांगतां सर्व आनंद जाला । बहूतांपरी राघवे गौरविला ॥ १९॥ पुढे राघवाची बहू स्तूति केली । विरांची असंभाव्य मांदी" मिळाली ॥ सभामंडळी ते कपी रीस राजे । तयामध्यभागी महावीर साने ॥ ५० ॥ समस्ताशी सोडीलसें इंद्र भावी | समर्था तया ऊपमा काय द्यावी ॥ असा राम हा देव ब्रह्मादिकांचा । समित्रासुतासी वदे रम्य वाचा ।। ५१ ॥ म्हणे होम आरंभिला इंद्रजीतें । मुखें बोलिले सत्य नैऋत्यनाथें । परा होम होतां कदां आंवरेना । समारंगणी मारितां ही मरेना ॥ १२ ॥ प्रतापें समारंगणी त्या वधावे बळे भाजि ब्रह्मादिकां सौख्य द्यावें ॥ पढें ऊठिला शीव सौमित्र कैसा । नभोमंडळी तीव्र आदित्य जैसा ।। ५३ ।। ११. जगज्जननी जगन्माता सीता. १५. माव-कपट. १६. ढूंद-युद्ध. १७. अधि. णी अशरीरिणी-आकाशवाणी. १८. व्योम आकाश. १९. मांदी-मेळा. २..मैक्र. स्यनाथ-राक्षस (बिभीषण).२१. आदित्य-सूर्य,