पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत बह कोपला चालिला वीर जेठी । प्रतापे म्हणे सर्व जाळीन सृष्टी । पढ़ें बापुडी वानरे दैन्यवाणी | खिळी तो बळे सर्व ब्रह्मांड बाणी ॥ २४॥ पित्याकारणे वीरभद्रू निघाला । तयां दैत्यजांला धरूं सिद्ध झाला ।। तयाचे परी कोपला काळरूपी । बळे चालिला शकशत्रु प्रतापी ।। २५ ॥ तुरे वाजती नाद गेला भुगोळा | दळेशी वळे पावला होमशाळा ।। तया राक्षसे मागुती होम केला । महावीर मेघासनी गुप्त झाला ।। २६ ॥ बळे जिले सर्व आकाश वाणी। पडो लागली वानरें दैन्य वाणी ।। कपी-वाहिनी" माजि आकांत जाला | पुन्हा मागुता थोर कल्पांत आला ॥ २७ ॥ वरी पाहतां युद्ध कर्ता दिसेना | घडाडा पडों लागली सर्व सेना ॥ महावीर ते घोर मागे पळाले | पळाले कपी राघवा आड गेले ॥ २८ ।। म्हणे राम तो सुनिवा मारुता हो । नभोमंडळी युद्धकर्ता पहा हो । प्रतापें बळे वीर सप्तै उडाले । असंभाव्य ते पोकळी माजि गेले ।। २९ ॥ महा योर ने युद्धसामर्थ्य गेले । तया इंद्रजीते पुढे काय केलें ॥ अकस्मात तो भूतळा माजि आला | रणामंडळी सैन्यसिंध मिळाला ॥ ३० ॥ खटाटोपिले ते बहू शस्त्रपाणी । रुपें कर्कशे काळ कर्कोटबाणी ॥ बळे चालिला भार वेष्टीत सेना । रजे मातला व्योम पूढे दिसेना ।। ३१ ॥ कपी वीर राक्षस सन्मख जाले । समारंगणा माजि यद्धा निघाले || पुढे राक्षसे रूप केले सितेचें । महा रम्य लावण्य ते जानकीचे ।। ३२ ॥ रणी लोटल्या वीर राक्षेस फौजा | कपीभार ऊठावले स्वामिकाजा । दळी राक्षसांचे बळी इंद्रजीतू | बळी चालिला काळ जैसा ऊतांतू ॥ ३३ ॥ तया देखतां धांवला रुद्र तैसा । करी घेतला शेल ब्रह्मांड जैसा ।। बळे इंद्रजीता उज़ धांव घाली । तयीं इंद्रजीते सिता दाखवीली ॥ ३४ ॥ म्हणे रे कपी हे सिता राघवाची । गुणी स्वामिणी हे तुम्हां मर्कटांची ।। महापापिणी सर्पिणी दु:खदाती त्रिकूटाचळी राक्षसी कंळहंती ॥ ३५ ॥ अशोकावनामानि हे शोकवल्ली । अकस्मात कोठून निर्माण झाली ।। तया दीवसापासुनी दुःख झाले | त्रिकूटाचळा थोर दारिद्र्य आले ॥ ३६ ॥ बळाचे बहू वीर हे पापिणीने | सखे आमुचे ग्रासिले सर्पिणीने । केळी मांडला त्यास हे मूळ सीता | करीतो इचा शीघ्र संहार आतां ।। ३७ ।। तया राक्षसे मारिले जानकीला ॥ म्हणे रे कपी सांग त्या राघवाला ।। समारंगी शीर छेदूनि नेले । तया राक्षसे शीघ्र गंतव्य केलें ॥ ३८ ॥ सिता देखता मारुती अंग घाली । प्रसंगी तिये मूर्छना शीघ्र आली ॥ १०. शकशत्रुहंद्राजत. १. वाहिनी-फौज. १२. कृतांत-यम. १३. कळी भांडण.