पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (४५) बळी दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे । तया देखतां अंतरीं सूख बाणे ।। प्रसंगे चि तो वीर युद्धासि गेला । प्रहस्तू रणी युद्ध होतां निमाला ॥ ९ ॥ तयाचा बहू क्रोध आम्हांसि आला । रिपू राम जिंकावया वेग केला ॥ तयाचे महां युद्ध ते काय बोलो । समारंगणी भ्रष्टलों भन्न जालो ॥ १० ॥ तया ऊपरी धीर आम्हां धरेना ! पुढे ऊठवीले बळें कुंभकर्णा ॥ तया सारिखा कोण आहे बळाचा । समारंगणी धीर काळासि कैंचा ॥ ११ ॥ महा वीर तो घोर युद्धासि गेला । रिसां वानरां योर संहार केला ।। रिपूने तया शेवटी बाण-घाते । समारंगणी धाडिला मृत्युपंथें ॥ १२ ॥ प्रतापी सखा बंधु माझा निमाला | बळे आगळा थोर आधार गेला ॥ मला पूसिल्यावीण गंतव्य केले । नये बोलतां दुःख ब्रह्मांड जाले ॥ १३ ॥ तया ऊपरी चौघ ही सूत माझे । अगा इंद्रजीता सखे बंधु तूझे ।। तयांच्या प्रतापानळे सूख लोटे । समारंगणी भीडतां काळ वीटे ।। १४ ॥ नरा अंतकाला नरा अंतकाने । बळे पीटिले देवदेवांतकानें ॥ तळी घातले सर्व त्या त्रीशिराने । रणीं वानरी घेतले सर्व प्राणे ॥ १५ ॥ अतीकाय तो वीर मेरू बळाचा । प्रतापें बळे आगळा विक्रमाचा || रथारूढ होऊनि युद्धासि गेला । तयाचा सुमित्रासुतें घात केला ॥ १६ ॥ निमाले सखे दुःख ऊदंड जाले । पुढे पाहतां वीर सामर्थ्य गेले ॥ महा वीर ते मृत्युपंथें चि जाती । नरें वानरे बापुडी येश घेती ॥ १७ ॥ निमाले सखे सूत बंधू बळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे ।। रणामंडळी सर्व सेना निमाली | बहूसाल संहारिली कूळवल्ली ॥ १८ ॥ अगा इंद्रजीता तुवां सूख द्यावे । प्रताप रणी सर्व शत्रू वधावे ।। मला सांगसी लाविले मृत्यु-पंथीं । परी मागुती ते रिपू गर्जाती ॥ १९ ॥ रिपू ऊठती मागुती है न व्हावे | बळे सर्व निर्मूळ त्यांचे करावे ॥ प्रतापे रणी सर्व पाडून येसी । परी मागुता जीव येतो तयांशी ॥ २० ॥ बहवेळ ती युद्ध सामर्थ्य केले । परी पाहतां सर्व ही व्यर्थ गेले ।। प्रतापें रणी पाडिले बाण-घाती । समारंगणी मागुते सिद्ध होती ॥ २१ ॥ महीमंडळी नाम त्यांचे नसावे । विरा विक्रमे त्वां मला सौख्य द्यावें ।। पिता बोलतां धीर पोटी धरेना । असंभाव्य कोपानळ सांवरेना ।। २२ ।। उभा राहिला वाक्य बोले पित्याशी । म्हणे शीघ्र संहारितों वैरियांशी ।। समारंगणा माजि ऐसे न होतां । तरी जाणिजे भेटि ते हे चि आतां ॥ २३ ।। ५. युद्ध होतां घोर मारें (पाठ). ६. बळें आगळा-शुळीहून तो (पाठ). ७. विक्रम- पराक्रम. ८. गर्जताती-ऊरताती (पाठ).* तां वां. ९. पाडिले मारिसी..