पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत बहू गा निळे झोकिला तो विशाळू । कपी सुनिवे टाकिला चंड शैलू ॥ सुमित्रा-सुते राघवे तेचि काळी । रिपू रावणी विधिला बाण-जाळी ।। १०३ ॥ बहूतां pमधी एकला इंद्रजीतू । रणों वोढिला काळ नैसा कृतातू ।। बळे वानरांचा बहू मार जाला । रिपू राक्षसे अंतरी तुच्छ केला ॥ १०४ ।। बहूतां जणांचा बहू एक मेळा | निमिष्यांत तोडूनि नेला स्वलीळा ।। पुढे राक्षसे घोर संधान केले । विरें विक्रमे सर्व सामर्थ्य नेले ।। १०५ ।। रिपूंची दळे पाडिली इंद्रजीतें । रणामाजि आली असंभाव्य प्रेते ।। रिसे वानरें राम सौमित्र बाणीं । बळें भेदुनि चालिला चापपाणी ।। १०६ ॥ पढ़ें सज्जनी चित्त द्यवि कथेला । समाचार सांगेल हा शवणाला ॥ महा वैर हे ऐकतां वैर नासे । म्हणे दास निर्वैर सूखें विलासे ॥ १०७ ॥ प्रसंग पांचवा समाप्त. प्रसंग सहावा. सभे बैसला राव त्रीकूटवासी । पुढें भेटला इंद्रजीतू तयासी ।। नमस्कार केला तया रावणाला । म्हणे शत्रुचा सर्व संहार केला ॥ १॥ बहू लंकवासी रणी भग्न केले । कितीएक ते मृत्यपंथें चि गेले ।। बळे ऊसणे घेतले हो तयांचे । प्रभू शोधिले मुख्य त्या वरियांचे ।। २॥ तया रावणा थोर संतोष जाला । बळें अमृताचे नदी पूर आला || अकस्मात संताप सर्वे उडाला । पुढे बोलता जाहला कमराला ॥ ३ ॥ म्हणे इंद्रजीता विरा बैस आतां । सुपुत्रा तुंवां तोडिली सर्व चिंता ॥ बळी चक्रचूडामणी वीर राजा । असो त्या तुझ्या वज कल्याण भूजा ॥ ४॥ अगा इंद्रजीता सखे गोत्र बंधू । प्रतापे बळे आगळे वीर सिंधू ॥ निमाले रणी वैरियांचनि हाते । बहसाल वाटे मनी दु:ख मातें ॥ ५॥ त्रिकूटाचळी वानरी लाग केला । मुळारंभ राक्षेस कीती निमाला ।। पुढे योर संग्राम दारूण जाला । "विर राक्षस सर्व ही तो बुडाला ।। ६ ॥ तया ऊपरी वीर धूम्राक्ष जेठी । तेणे जिंकिले देव तेतीस कोटी ॥ समारंगणी त्या विरा अंत आला । रणामंडळी देह त्यागन गेला ॥ ७ ॥ रणी वजदंष्ट्री दिमे यमरूपी । गिरासारिखा अंकपन्नु प्रतापी ।। महा वीर ते दोघ युद्धासि गेले । समारंगणीं युद्ध होतां निमाले ।। ८ ॥ p जणीं. ८२. रुतांत यम. छेदनि. r जालों. १. बळीचक्रचूडामणी बळीसमूह- शिरो भूषण. २. असो त्या असाव्या (पाठ). ३. सिंध-सागर. 2, विरें वीर तो प्रेतसिंधू बुढाला (पाठ).