पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (१३) रणी राक्षसां थोर संहार जाला । समाचार गेला तया रावणाला || LLL पुढे रावणाने बहू दुःख केले । नसे अंतरी सौख्य टाकून गेलें ॥ दशग्रीय बोले विरा इंद्रजीता । प्रतापें रणा माजि तूं जाय आतां ।। ८९॥ रिसां वानरांची असंभाव्य सेना | तुज वेगळी सर्व संहारवेना ।। उभा राहिला शीघ ऊदीत जाला । म्हणे० शीघ्र संहारितो वरियांला ।। ९०॥ दळे चालिली राक्षसांची अचाटें । पुढें वीनिती भीट वैताळ थाटें ।। बळी *रावणी तो रथारूढ जाला । बहसाल वाद्ये दळेशी निघाला ९१ ॥ रणा माजि येवोनियां होम केला । महा भीम कृत्या रथ प्राप्त जाला ॥ रथारूढ होऊनि वेगी उडाला । नभोमंडळा माजि तो गुप्त जाला ॥ ९२ ॥ असंसाव्य ती मोकळी बाण-जाळे । बळे धांवती प्रेरिले दूत काळे ॥ कपी! तुटो लागली कंठ-नाळे । रणी लोटती वीर-प्रेते सकाळे ॥ ९३ ॥ असंभाव्य सामर्थ्य त्या रावणीचे | कळेना कळा कोण कापट्य याचे ।। कदां नेणती बापुडे देव कांहीं । रणी पाडितो वीर सन्मख नाहीं ॥१४॥ बह खोंचली ते असंभाव्य सेना । दिशा दाटल्या बाण-जाळी दिसेना ॥ कपी-वाहिनी मानि आकांत जाला । पढे मारुतीचा पिता शीघ्र आला || ९५ ॥ निरूपी अती आदरें राघवाशी । म्हणे अंगिराअ-स्त्र योजी त्वरेशी ॥ पढे राम तात्काळ तें अस्त्र घाली । तेणे तूटले शीर कृत्या निमाली ॥ ९६ ॥ पढें रावणी भूतळा माजि आला ! रणामंडळी मृत्यु जैसा उदेला ॥ भयासूर तो वीर घोर प्रतापी | शरा सोडिता नाहला काळ-रूपी ॥ ९७।। समस्ती अकस्मात तो देखियेला । तया एक वेळा बहू मार केला ॥ कपी वीर ऊठावले शीच काळे । शिळा शीखरे टाकिती बाण-जाळें ।। ९८॥ रणी रावणी येकला वीर जेठी । कपी लोटले लक्ष कोट्यानुकोटी ।। रिसी वानरी थोर कल्लोळ केला | बळें ताडिते नाहले राक्षसाला ॥ ९९ ।। बळे फेंकिला शूळ त्या मारुताने । गदा घेतली शीघ बीभीषणाने ॥ परीघौशी घेऊनियां शीघ्र धांवे । कमद करी वेग नेटें उठावे ॥ १० ॥ कपी षभा थोर आवेश झाला । शैतन्त्रीस घेऊनि सन्मुख जाला ॥ द्विवीदें बळे सोडिले चक कैसे । महा पर्वती चालिले वज जैसे ॥ १०१ ॥ सुगधे विरे ताडिला शस्त्र-घाते । गिरी-शंग तो टाकिला जांबुवंते ॥ शिळा टाकिली चंड त्या अंगदाने । महा खड ते मोकलीले नळाने । १०९॥ बहूसाल वाडे दळेशी निघाला. ०५. वानिती-णितो. ७६. मार-स्तुतिपाठक. ७७. घेताळ माट. * रावणी इंद्रजित. ७८. मोकली-सोटी. ७९. परिघ-शस्त्रविशेष.८०. ऋषभ श्रेष्ट. ८१. शतघ्नी-तोफ.