पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत कपी-बाहिनीचा असंभाव्य थावा । प्रता बळें शीघ्र केला उठावा ।। शिळा शीखरे हाणिती राक्षसांतें । रिपू मारिती वानरां बाण-घाते ।। ७४ ॥ महा युद्ध आरंभिले एकमेकां । तयां भीडतां तो धरी काळ शंका ॥ रणी राक्षसां पाडिले घोर मारें । कपी वीर ते गर्जती भूभुकारें ।। ७५ ।। रणा माजि मनाक्ष तो शीघ्र कोपे। पुढे चालिला चापपाणी प्रतापे ॥ स्वये आपुले सैन्य घालनि मागें | कपी भेदिता जाहला लागयेगें ॥ ७६ ॥ बळे सोडिली राक्षसे बाण-जाळे । तुटो लागती वानरांची शिंसाळे । थटाटां रणी तूटती पादपाणी । शरीरें बहूसाल विक्राळ वाणी ।। ७७ ॥ देहे खोचले थोर महा विरांचे । झरे लागले वाहती शोणिताचे ।। रिपू झुंझतां राक्षसें भग्न केले । कितीएक ते भार मागे पळाले ।। ७८ ॥ नळे धांवती बाण ते लागवेगें । पळाले वळाचे कपी सर्व मागें । कपींची दळे भंगिली राक्षसाने । तया मस्तक तूकिला राघवाने ॥ ७९ ॥ रणी मांडिला थोर कल्पांत सृष्टी । बहुतां विरी दीधली त्याशि पृष्ठी ।। रणामाजि कोणास ही राहवेना । करी घोर संधान ते साहवेना ।। ८० ॥ ह्मणे राम हो कोण सामर्थ्य याचे । रणी भंगिले सैन्य गोळांगुळाचे ॥ वरी अंतराळी बहू बाण-जाळे । क्षणा माजि ते तोडिले शीघ्र काळें ।। ८१ ॥ उभा राहिला राम वजांग-ठाणे | गुणी लाविलें चापा चंद्रार्द्ध बाणे ॥ टणत्कारिले सौत बोटी थरारी । महाचंड ब्रह्मांड घोघे गरारी ।। ८२ ॥ वळे राक्षसे व्योम संपूर्ण केलें । रणी राघवे mशीघ्र छेदूनि नेले ।। पुढे घेतला दूसरा बाण रामें | गुणी लाविला थोर शत्रू विराम ।। ८३ ।। विरे मागुते थोर संधान केले । रिपचे रणी शीर छेदान नेले ।। महा वीर मक्राक्ष तो बाण-घातें । निमाला रणी चालिला मृत्यु-पंथे ।। ८४ ॥ पुढे राम पाचारिला त्या खराने । विशालाक्ष ऊठावला थोर त्राणे ।। म्हणे राज-पुत्रा बरे युद्ध केले । रणी विक्रमे शीर छेदूनि नेलें ॥ ८५ ॥ असे सर्वदा तो जयो प्राप्त कैंचा। करी ग्रास राहू रवी मंडळाचा ।। प्रती उत्तरें बोलिला राम वाणी | बळें जिले भूमि-आकाश बाणी ।। ८६ ॥ तिहीं राक्षस घोर संधान केलें । विसं वाटले थोर कल्पांत जाले ॥ पुढे तोडिले सर्व ही बाण रामें । प्रताप रणामाजि त्या पूर्ण-कामें ।। ८७ ॥ प्रताप रणी राघवे बाण-घाते । रिपू दोघ हि धाडिले मृत्यु पंथे ॥ ७०. शिसाळे डोकी. १. शोणित-त. ७२. तकिला-डोलविला. ७३. गोला- गुळ-वानर. I ते घोर. ७३. सीत-तिरकमट्याची दोरी. m सर्व. n मुजती सर्व आ- काश-वाणी.