पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड उभारे उभा फीर मैदा द्विवीदा । रणा मानि जाशी कुठे रे अंगदा ॥ ६ ॥ बहू विक्रमें पाडिले राक्षसांशी । रणी ऊसने शीघ्र घेतो तुम्हांशी ॥ क्षणी तेचि कोदंडे घेऊनि हाती । कपी मैद तो भेदिला बाण-घाती ।। ६१ ॥ नवां बाण-घाती कपी भग्न केला । रणामाजि तो प्रेत होऊनि ठेला ॥ द्विवादाशिं दाही शेरी तोच काळीं । विरें राक्षसे पाडिले बाण-जाळी ॥ ६२ ॥ पुढे पाहतां देखिले अंगदाला । कपी वीर तो वृक्ष घेऊनि आला ॥ बळे हाणितां वीळिले हस्त बाणी | चळेना कपी वीर तो वैजठाणी ॥ ६३ ।। उभा राहिला बाण झेलीत कैसा । कुँठारा तळी छेदिजे वृक्ष जैसा || तया अंगदा शीघ प्राणांत आलें । रघुनायका वानरी जाणवीले ।। ६४ ॥ मखें बोलती अंगद वीर गेला । कपीनाथ सुग्रीव तैसा उडाला ॥ रथारूढ होऊनि कोदंडे हाते । बळे मोडिले तोडिले kवृक्ष-घाते ।। ६५ ॥ रणी कुंभ तो मल्ल-युद्धासि आला । बळे ताडिता जाहला सुनिवाला ॥ तया सुनिवे दीधली वज-मुष्टी । रणी पाडिला कुंभ तो प्रेत सृष्टी ।। ६६ ।। महा वीर तो धाडिला मृत्यु पंथें । निकुंभे रणी हाकिले सनिवाते ।। कपीनाथ सुग्रीव घालूनि मागे । पुढे धांवला मारुती लागवेगें ।। ६७ ॥ तया राक्षसे भेदिले मारुताला । कपीवीर किंचीत मूर्चीत जाला || पुढे ऊठला तो कपी काळ जैसा । मना माजि आवेश अद्भूत तैसा ।। ६८ ॥ महा पर्वतू घेतला मारुताने । निकुंभावरी टाकिला पोर त्राणे ॥ गिरा टाकितां शांति जाली तयाची । फळी फूटली सर्वही राक्षसांची ।। ६९।। त्रिकुटाचळा माजि घायाळ गेले । रिपू प्राण घेऊनि तैसे पळाले । भयातर ते सांगती रावणाला । बळी तो निरवीर सर्वे निमाला ॥ ७० ॥ बहू दुःख जाले तया रावणाशी । पुढे धाडिले शीघ्र तीघां सुताशी ॥ विशालाक्ष मक्राक्ष आणि खराते । रणा पाठवीले तिघां कूमरांते ॥ ७१ ॥ तिघे ही दळेशी बळे सिद्ध जाले । असंभाव्य ते भार मागे मिळाले ॥ महा विक्रम झेलिती वीर बगें । समारंगणी पावले लागवेगें ॥ ७२ ॥ बंडगे लोहो मूसळे शूळपाणी । कटाऱ्या सुया तोमरें चापणी ॥ बहू खेटके मुद्गले आणि भाले । महा वीर राक्षेस युद्धा निघाले ।। ७३ ॥ ५८. कोदंड-तिरकमठा. ५९. शर-बाण. ६०. वजठाण दृढासन. ६१. कुठार-कु-हाड. ६२. कोदंड-तिरकमठा. k राक्षसांनं. ६३. मल्लयुद्ध-कुस्ती. ६४. बाण-जोर. ६५. खर्ग=तरवार.६६. शूळपाणी-त्रिशळ आहे हाती ज्याच्या असा. ६७. तोमर-एक प्रकारचे शस्व. ६८. चापपाणी तिरकमठा आहे हातों ज्याच्या असा. ६.. खेटक- ढाल.