पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. बळे क्रोध आला तया पावकाला । वरी वात वेगी बळे साय जाला ॥ शिखौं चालिल्या अंतराळी धडाडां । जळों लागली दिव्य लंका भडाडा ।। ३३ ।। अपारे घरे गोपुरे रम्य सारे । बहसाल धामोदरे थोर थोरें ॥ पडो लागली दग्ध होतां धबाबां । महा राक्षसी तोंड घेती खबाबा ॥ ३४ ॥ ध्वनी राक्षसांची असंभाव्य जाली । मुखे बोलती आग रे आगि आली ॥ कितीएक राक्षेस धावूनि आले । अकस्मात ते वीर सर्वे मिळाले ॥ ३५॥ बळे धांवली ते असंभाव्य सेना । पुढें जावया लाग कोठे दिसेना ॥ शिखा धांवती वन्हिच्या पाठि लागे । पळाले बळी प्राण घेऊनि वेगें ॥ ३६॥ बळे सटली वैभवें राक्षसांची । बहू दाटली वाट प्रेते विरांची।। कितीएक ते धीट नेटे जळाले । कितीएक ते वीर मागे पळाले ॥ ३७॥ त्रिकटाचळी थोर आकांत नाला । असंभाव्य राक्षेस कीती निमाला ॥ स्त्रिया बाळके जेथ जेथे पळाली । शिखा लागतां तेथ तेथे जळाली ॥ ३८ ॥ पळायास मागे पुढे रीघ नाहीं | जळाले पुरीमाजि ते सर्व काहीं । बह कुंजरें शार्केट अंश्च नाना । निमाले रैथी सौरथी सर्व सेना ।। ३९ ॥ सह दहा भूवैने रावणाची । जळाली बहू संपदा वैभवाची ॥ सुवस्ता अळंकार दिव्यांबराँची । सुगंधेल आज्यादि नाना रसींची ॥ ४० ॥ गरें वांसरे जाळिली पावकानें । बहू हाँट बाजार केणी-दुकानें ॥ बहतां नणांचे बह वित्त गेलें । त्रिकटाचळा पाव शद्ध केले ॥४१॥ बह सायी भले मोठ मोठे । भुसारी जरी जोहरी आणि चौटे ॥ जळाले बहू वित्त हाणोनि घेती । धरेना कदा सांवरेना रुदंती ॥ ४२ ॥ सभा-मंडपी राक्षसी हाक नेली । म्हणे पाहतां काय लंका जळाली ॥ दहा योजने तीसरा भाग जो कां । बळें जाळिली वानरी gसर्व लंका ॥ ४३ ॥ तया रावणा वाटली सर्व चिंता । म्हणे पाठवावे रणी कोण आतां ॥ म दीसे मुखीं मंदली सर्व शोभा । पढे बोलिला शीघ कुंभा निकुंभा ॥ ४४ ॥ म्हणे वानरी नाळिली सर्व लंका । तयांशी करा युद्ध टाकूनि शंका ।। तया सांगतां सर्व ऊदीत नाले। महा वीर ते सात यद्धा निघाले ॥१५॥ बळी कुंभ नीकुंभ जंघ प्रजंघे । दळे सिद्ध केली बळे लागवेगें ॥ शिखाज्वाला. ३६. घाम घर. f. जळाले ' पा० मे०.३७. कुंजर-हत्ती.३८. शकट-गाठा. ३९. अश्व-घोडा. ३०. रथी-स्थांत बसणारे. ११. सारथी-रथ हाकणारे. १२. भवने घरें.१३. दिव्यांबरें-उंची वस्त्रे.१४. आज्य=रोळीचे तुप (अजा-शेळी). १५. रस-पातळ पदार्थ. १६. हाट-बाजार. १७. केणी जिन्नस. १८. वेवसायी उद्योगी, व्यापारी. १९. भुसारी धान्य विकणारे. ५०, चाटे-कापड विकणारे. ५१. रदतीचडती. g. 'शीन' पा० मे.