पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८) श्रीरामदासकृत नमस्कारिले त्या रघनायकासी । उभा राहिला हात जोडोनि पाशी ।। म्हणे राम धन्य गा धन्य चीरा | कपी काय द्यावे तुझ्या ऊपकारा ।। १९॥ अगा मारुती तूझिया उपकारें । जिवा ऋण जाले बहूसाल भोर ।। सदा सर्वदा आमुची थोर चिंता । समस्तांसि तूं एकला प्राण-दाता ।। २० ॥ म्हणे मारुती सर्व स्वामी प्रतापें । प्रभू काय कीजेल म्यां दीनरूपें ॥ समर्था तुझेनी कृपेवीण कांहीं । स्वता अल्पही कार्य होणार नाहीं ॥ २१ ॥ बहूतां परी मारुते स्तूति केली । मनोवृत्ति ते राघवाची निवाली ।। पुढे राघवे रुद्र संतुष्ट केला । बहूतां परी आदरें गौरवीला ॥ २२ ॥ प्रसंगे केपी-नाय सुग्रीव बोले । म्हणे मारुती प्राण त्वां रक्षियेले ।। कुळामाजि जालासि पूर्ण प्रतापी । कपीची कुळे सर्व ही श्लाघ्यरूपी ।। २३ ॥ कपी सर्व ही बाण-जाळे निमाले | तुझीया प्रताप पुन्हा जन्म जाले ॥ प्रसंगे सखा राघवे निर्मिलासी । कपी कारणे तूं बहू कष्टलासी ॥ २४ ॥ तया बोलतां मारुता सूख जालें । पुन्हा मारते ही बहू तोषवीले ॥ असो हे बहूसाल पाल्हाळ-गोवी । कथा राहिली ते पुढे चालवावी ॥ २५ ।। कपी-नाथ बोले रघुनायकासी । नये रावणू चंडदुःखे रणासी ।। तर शीघ्र लंकापुरी जाळवावी । समथै कपीलागि आज्ञा करावी ॥ २६ ॥ पुढे बोलिजे सुनिवालागि देवें । तुम्हीं कल्पिले कार्य सिद्धीस न्यावे ।। फपी राम-आज्ञेस घेऊनि वेगी । विरांलागि आज्ञा करी ते प्रसंगी ।। २७ ।। तुम्ही लागवेगें चुड्या पाजळीने । वळे शीघ्र लंकापुरी दग्ध कीजे ॥ करी घेतले उंच बांधूनि भारे । कपी धांवती एकमेकां पुढारे ।। २८ ।। चुड्या पावके सर्व ही दीप्त केल्या । अकस्मात लंकापुरीमाजि नेल्या ।। बळाचे कपी धांवती लक्ष कोटी । चुड्या खेळती थोर आनंद पोर्टी ।। २९ ॥ शिखा लागतां शीघ्र नाले उमाळे । निळे पीवळे श्वेत औरक्त काळे ॥ बहू लागला चेंडे यारा भरारां । परी माजि तो चन्हि धांवे सरारां ॥ ३० ॥ गृहागोपुरा जाहला एक वेळा । असंभाव्य हेलावती तीव्र ज्वाळा ।। दिशा दाटल्या धूम्र आकाश-पंथे । पिडा नाहली खेचैरां भैचरांते ।। ३१ ।। मळे धूविली ती तया रावणाने । सळे ऊसणे घेतले पैविकाने । वळ लागतां थोर को कडाडी । बळें माजला वन्हि पोटी धडाडी ।। ३२ ।। २१. कपी-नाथवानरांचानाईक. २५. श्लाध्य-स्तत्य. २६. निमाले मेले. २७. शिखा-ज्वाला. २८. श्वेत पांढरा. २१. आरक्त लाल. ३०. चंड-सपाट्याचा. ३१. वन्हि विस्तव, ३२. गोपुर-देवडी. ३३. खेचर-आकाशांत हिंडणारे. ३१. भुचर-पृथ्वीवर हिंडणारे. ३५. पावक विस्तव.