पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. तयाच्या तिरी उंच आकाश पंथें । विरें देखिलें रम्य द्रोणाचलाते ॥ तया मस्तकी दिव्य वल्ली अपारा | प्रभा फांकली तेज कल्लोळ सैरा ॥ ५॥ पुढे देखतां मारुता सांवरेना | धरीतां बळे तेज हाता चढेना ।।। महा औषधी दिव्य शैल्या निशल्या । कपी देखतां सर्व ही गुप्त जाल्या ।। ६ ॥ तया पर्वताची बहु स्तूति केली । परी नायके सर्व ही व्यर्थ गेली ॥ बहूसाल त्या 'अचळे गर्व केला । पुढे मारुता कोप तात्काळ आला ॥ ७॥ महा थोर धिःकार केला तयासी । बळे शीघ्र उत्पाटिले पर्वतासी ।। गिरी घेतला पुच्छ वेष्टीत मायां । कपी-राज तो चालिला व्योम पंथा ॥ ८ ॥ रणी जाहला सर्व संहार जेथें । महावीर आला अकस्मात तेथें ।। निशा दाटली अंधकारे दिसेना । गिरी ठेवितां देखिली सर्व सेना ॥ ९॥ पिता पावला तो बळे मारुतीचा । रणीं वास नेला तया औषधींचा ।। सुगंधे चि ते वीर आरोग्य जाले । कपी सर्व ही मृत्यु मारूनि ठेले ॥ १० ॥ दळेशी बळें ऊठला रामराजा | स्फुराणे रणी गर्जती वीर-फौजा || पुढे मारते घेतले पर्वताला । क्षिराब्धी तटीं शीघ्र ठेवूनि आला ॥ ११ ॥ तुलेना गती शक्ति माहा विराची | कळेना करी कोण संख्या बळाची ॥ दिसे पाहतां वानरू वेषधारी । परी जाणिजे सत्य हा त्रीपुरारी ।। १२॥ निशीच्या 'पदें चारि कोटी उडाला । गिरी दोपदी शीव घेऊनि आला || पुन्हा मागुती तीपदां माजि नेला । प्रभातें चि चौथे पर्दी प्राप्त जाला ।। १३ : सहस्रक "गांवे गिरी स्थूल मोठा । असंभाव्य या मारुतीचा चपेटा ॥ उडाला नभी योजने कोोट सोळा । नसे शोधितां दूसरा या भुगोळा ॥१४॥ बहू पंथ चाले रवी भार नाना | बहू भार वाहे फैणी तो उडेना ।। गरूडासि तो आचळू हालवेना । दुजी साम्यता ब्रह्म-गोळी दिसेना ।। १५ ।। पुढे मारुती भव्य आनंद-रूपी | नभोमंडळी भानु जैसा प्रतापी ॥ महा वीर तैसा दळामाजि आला । समस्तांसि देखोनि आनंद जाला ॥ १६ ॥ सखा तो जिवाचा असे दुरि देशी । सदां लागले चित्त हे त्याजपाशी ॥ पुढे पाहतां तो अकस्मात आला । तया सारिखे जाहले मारुताला ॥ १७ ॥ कपीने कसे पाहिले राघवासी | पुढे देखिले लोभियाने धनासी ।। तथा बाळके देखिले जननीला । तया सारिखें जाहले मारुताला ॥ १८ ॥ १३. अचळ पर्वत. १४.निशा रात्र. c. 'कपी' पा. भे.. १५. संख्या गणना. १६. त्रिपुरारी शिव. १७. पद-चवथा हिसा (प्रहर ). d. 'द्रोण तो' पा. भे.. १८. गांव योजन-चार कोस. १९. गिरी पर्वत. २०. फणी शेष. २१. भानुसूर्य. २२. प्रतापी =ऊन पाडणारा, पक्षी शर. e. बाटले राघवाला' पा. भे.. २३. जननी आई.