पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६) श्रीरामदासकृत पुढे ऋक्ष बीभीषणालागें पूसे । महावीर ते मुख्य आहेत कैसे ।। म्हणे जांबुवंतासि नैऋत्य-नाथू । विरा पुससी काय जाला अनथू ।। ९२ ।। महावीर दोघे निचेष्टीत जाले । परी मुग्रिवादीक सर्वे निमाले ।। रणामाजि ते शोधिनी सर्व सेना । समस्तामध्ये एक तोही दिसेना ।। ९३ ।। प्रसंगी निरूपी यथातथ्य मातू । मनामाजि तो जांबुवंतू निवांतू ।। म्हणे वीर बीभीषण नांबुवंता | समस्तासि कल्याण ते सांग आतां ।। ९४ ।। म्हणे ऋक्ष तो मारुतीवीण कांहीं । विरां ऊठवाया दुजा प्रेत्न नाहीं ।। क्षिराब्धी-तटी योजने चार कोटी । गिरी द्रोण आणील हा वीर जेठी ।। ९५ ।। महा रम्य द्रोणाचळ भव्य रूपी । तया मस्तकी औषधी दिव्यरूपी ।। बळे आणितां ऊठती सर्व सेना । कपी मारुतीवीण दजा दिसेना ।। ९६ ।। म्हणे जांबुवंतासि नैऋत्य-नाथू । असंभाव्य तूं सांगशी दूर पंथू ।। गमे प्रेत्न हा सर्वथा ही घडेना । गिरी मारुतीचेनिही आणवेना ।। ९७ ।। म्हणे गा विरा काय तूं बोलिलाशी | कपी सारखा मारुता भावितोशी ।। परी नाणहा ईश्वरू साक्ष रूपी । कळेना जना रुद्र पूर्ण-प्रतापी ।। ९८ ।। बहु स्तुति केली तया मारुताची । तये तोषली वृत्ति बीभीषणाची ।। म्हणे गा विरा संकटी धांव घाली । बळें ऊठवीं सर्व सेना निमाली ॥ १९ ॥ कपी मारुती उत्तरे सिद्ध जाला । मनी चिंतिले राम-पौदांबुजाला ।। महावीर आणील द्रोणाचळातें । पुढे वीनवी दास तो श्रोतयांत ।। १०० ।। प्रसंग ५वा प्रारंभ. उभा राहिला वीर मंदार जैसा । मनाहूनि पूढे बळे वेग तैसा ।। रुपे कर्कशू पाहता पाहवेना । बहूसाल उंचाट त्या राहवेना ।। १ ।। अकस्मात तो व्योम-पंथें उडाला । मही झोकली पन्नगा भार जाला ।। बहू झोकिले कर्म वाराह दंती । झडा चांचरे ते धरा सांवरीती ।। २ ॥ स्फुरदूप सर्वांग बाजे झडाडां । उडाले नभी वृक्ष वाते फडाडां ।। असंभाव्य पिंजारिले पुच्छ मागें । नभोमंडळी जातसे लागवेगें ।। ३ ।। बहू लांघली फोकळी घेग केला । द्विपे पांच ही शीघ्र टाकनि गेला ।। उडाला बळे पांच सिंधू अंगाधू । पुढे देखिला साहवा क्षार सिंधू ।। ४ ।। ७१. नैऋत्यनाथ-राक्षसांचा स्वामी. h. 'कपी' पा. भे.. i. 'वदेना' पा० भ०. ७२. पादांबज पदकमल. १. व्योम-आकाश. २. पन्नग शेष, सर्प.. 'धाकल पा० भ०.३. कम-कासव.३. वराह-डकर. ५.दंती-हत्ती. b.चाँचरीती' पा० भ०.६. धरा-पृथ्वी. ७. पुच्छशेपुर. ८. नभोमंडळ=आकाशमंडळ...ट्ठींप-बेट. १०. सिधु- समुद्र.११. अगाध खोल. १२. क्षीर दूध.