पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड: (३५) रणा चालिला वीर संग्राम सैरा । दळेशी बळे लोटला भार सैरा ॥ रयां घोडियां कुंजरां “मीति नाहीं । बहूसाल वाद्ये पुढे एक घाई ।। ७८ ।। महा वैभवेशी रणामाजि आला । तया इंद्रजीते रणी होम केला ।। यथायोग्य पूर्णाहुतीचेनि तोपें । रयू दीधला. अग्निवर्ण हुँताशे ।। ७९ ॥ रथू तोमरू-खड़ बाणी विराने । वरी रावणी तो महा वीर साजे ।। उडाला रथेशी बळें अंतराळे । असंभाव्य सोडी तळी बाण-जाळे ।। ८० ।। बळे सूटले बाण त्या राक्षसाचे | बहू खोचले भार गोळींगुळांचे ।। bफुटो लागले कोथळे पादपाणी । भये बोलती वानरे दैन्य वाणी ।। ८१ ।। कितीएक ते वीर भेणे पळाले । पुढे नात जातांचि चौरंग केले ॥ कितीएक धाकें विरां आड जाती । अकस्मात तेथे चि ते भेदिजेती ।। ८२ ।। कपी-वाहिनीमानि आकांत नाला | रणीं तो विरे वीर सर्वे निमाला || सुमित्रा-सुतू बोलिला राघवाला । बहू आट नाला रिसां बानरांला ।। ८३ ।। पढे बोलता बोलतां ते चि काळीं । अकस्मात ते भेदिले बाण-जाळी ।। निचेष्टीत भूमी धनुष्ये गळाली । विरे इंद्रजीते c बहु ख्याति केली ॥ ८४ ।। बळी रावणी एकला वीर जेठी । कपी पाडिले लक्ष कोट्यानुकोटी ।। महा वीर ते धीर मेरू बळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे ।। ८५ ॥ रिसां वानरां सर्व संहार केला । पुरी माजि तो येश घेऊनि गेला ।। नमस्कार केला तया रावणाला । दळेशी बळें राम शत्रू निमाला || ८६ ॥ रणी सर्व ही पाडिले प्रेतराशी । बहूसाल आनंद त्या रावणासी ॥ महा सुख लंका-पुरीमाजि ऐसें । पुढे वर्तले वानरांमानि कैसें ॥ ८७॥ कपी रीसd ते पर्वता तुल्य कैसे । निमाले रणी पाडिले वृक्ष नैसे ।। तयांमाजि कल्याण दोघां जणाला । कपी मारुती आणि बीभीषणाला || ८८|| रण माजले सर्व ही प्रेतरूपी । तया माजि ते दोघे उद्विग्न रूपी । विचारूनियां "वन्हि शीखा उजेडे । रणा शोधिले सर्व तिीही निवाडे ॥ ८९ ॥ रणा शोधितां सर्व सेनेसि अंत | तयामाजि तो बोलिला जांबुवंत ॥ पढे वीर ते शीघ्र धांवूनि आले । तया पाहतां बाण आंगी बुडाले ॥ १० ॥ बहसाल तो रीस घायाळ जाला । बळीg बाण-जाळी रणी आकळीला ।। महावीर बीभीषणे ऊठवीला । बळे बाण वोटूनियां स्वस्थ केला ॥ ९१ ॥ ६६. मिनि-गणति... 'तयालागि' पा० भे०.६७. हुताश-विश्तव.६५. गोलांगल =वानर. b. 'तुटों' पा• भे०. c. 'रणीं' पा० मे.. d. — वीर' पा० मे... 'ठेविले' पा. मे०.६९. उद्विग्न दुःखी. ७०. वन्हिशिखा विस्तवाची ज्वाला. f. हो ने' पा. भे.. .'बहू' पा. मे..