पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र. एक पत्र पाठविले. त्याचे उत्तर परत गेल्यावर शा० श. १५७१ विकारीनामसंव- सरा वैशाख शु. ९गुरुवारी शिंगणवाडीस स्वामींचे साक्षात् दर्शन शिवाजीमहारा- जांस झाले. ते वेळी त्यांचे वय २३ वर्षांचे होते. बरोबर बाळाजी आवजी चिटणीस व निळो सानदेव होते. स्वामींनी शिवाजीमहाराजांस बोध केला तो दास बोधाचे तेरावे दशकांत सहावे समासांत आहे. त्यास लघुबोधं म्हणतात. नंतर स्वामीनी राजास एक नारळ, मूठभर माती, दोन मुठी लोद, व चार मुठी 'खडे असा प्रसाद दिला. पदे शिवाजीमहाराज राज्य सोडं लागले तेव्दा राजधर्म व क्षात्रधर्म त्यांस सांगून तिकडून त्यांचे मन त्यांनी वळविले. नंतर बाळाजी आवजी व निळो सोनदेव यांस सेवकधर्म सांगितला. मग तीन दिवस जवळ ठेवून घेऊन चवये दिवशी शिवाजी महाराजांस स्वामींनी निरोप दिला. वामन पंडितांवर अनुग्रह स्वामीनों केला तेव्हां त्यांनी स्वामींवर एक संस्कृत स्तोत्र केले. त्याच वर्षी आषाढांत पंढरीस स्वामी गेले. तेथे जांब येथील मंडळी यात्रेस आली होती त्यांज बरोबर मातोश्री व ज्येष्ठ बंधू यांस पत्रे त्यांनी पाठविली. पुढे काही दिवसांनी शा० श० १५७२ त शिवाजीमहाराजांचे विनंती वरून स्वामी परळीचे किल्ल्यावर राहूं लागले तेव्हां त्यास सज्जनगड असे नांव त्यांनी ठेविले. तेथे राहते समयीं स्वामिांनी त्या किल्लयाचे नैऋत्य कोनास मारुतीची व दक्षिण दरवाजांत अंगाई देवीची स्थापना केली. त्या ठिकाणी स्वामींचा नित्यभोजनखर्च चालावा म्हणून मौजे वावरदेर या गांवचा वसूल त्या कामाकडे महाराजांनी लावून दिला व स्वामींच्या विड्याच्या खर्चाकडे मेढेखोरें येथील जकातीचे उत्पन्न लावून दिले. नंतर शिवाजी महाराजांस स्वामींनी बाग कसा तयार करावा हे सांगितले. त्याच वर्षी कर्नाटकांतील सामनगड किल्ला शिवाजी महाराज बांधीत असतां किल्ला कसा बांधावा याविषयों स्वामींनी त्यांस बोध केला. पुढे शा० श. १५७३ त ज्येष्ठ बंधूंकडून जांब येथन पत्र आले त्याचे उत्तर स्वामींनी ओवीबद्ध पाठविले. त्याच वर्षी स्वामींचे आज्ञेवरून शिवाजीमहाराजांनी श्रावणमासी कोटिलिंगे करविणे, ब्राह्म- २. ठाणे येथे सर्योदय छापखान्यांत सन १८१० त छापलेलें चरित्र पृ. ८३-८४ पहा. ३.हाणे येथे सोदय छापखान्यांत "८८-९. पहा. १.ठाणे येथे सदिय छापखान्यांत .९२-32 पहा. ५. ठाणे येथे सूर्योदय छापखान्यांत सन १९६-१०१ पहा. ६. ठाणे येथे सर्योदय छापरवान्यांत सन ठाणे येथे सूर्योदय छापखान्यांत सन ११२६-१२७ पहा. ८. ठाणे येथे सर्योदय छापखान्यांत सन "१३३-१३५ पहा. १. टाणे येथे सर्योदय छापखान्यांत सम "1३८-18२ पहा. १०. दाणे येथे सूर्योदय छापखान्यांत सन १२३-१४४ पहा "१०६-१०७ पहा.