पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) श्रीरामदासस्वामींचें चरित्र. श० १५३७ राक्षसनामसंवत्सरी मार्गशीर्ष शु० ९ मीस रामदासस्वामींचा पिता हा परलोकवासी झाला. पुढे भानजी. गोसावी बोधलापूरकर यांची कन्या नारायण यास देण्याचे ठरून सर्व तयारी होऊन ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणतांना " सावधान" या शब्दाचा उच्चार करतांच नारायण हा पळून गेला. लग्नाचे पूर्वी एकदां नारायण याने झाडा वरून पाण्याचे डोहांत उडी टाकिली होती त्यामुळे खडकावर कपाळ आपटून एक टेगूळ आले तें. आमरण तसेच होते. लग्नांतून पळन गेल्यावर शा० श. १५४२ रौद्रना- मसंवत्सरी माघ शु०७ चे दिवशी रामभजनांत काळ घालविण्याचा नारायण याने निश्चय करून त्याप्रमाणे वर्तल्यामळे त्यास रामदास असें म्हणूं लागले. । नाशकाजवळच्या टाकळी गावापासन एका कोसावरच्या दशकपनक नामक गांवचा कुळकर्णी याने आपला पहिला मुलगा स्वामींस दिला त्याचे नाव उद्धव असे त्यांनी ठेविलें. शा. शा. १५४९ त प्रभवनामसंवत्सरी वैशाख शुद्ध २ स स्मामांचे भावी शिष्य शिवाजीमहाराज जन्मल. नंतर शा० श० १५५४ या वर्षी फाल्गन शद्धपक्षी स्वामी उद्धवास टाकळीस ठवून पृथ्वी प्रदक्षिणेस गेले. . काशी, अयोध्या, गोकुल, मथुरा, वृदावन, द्वारका, पिडार्क, प्रभास. श्रीनगर केदार, बदरीनारायण, उत्तर मानस सरावर जगनाथ, रामेश्वर, सेतबंध. सिंहलदीप गोकर्ण, मल्लिकार्जुन, कातिकस्वामा, • परशुराम क्षेत्र, महाबळेश्वर, पंढरी. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, पचवटी, रून स्वामी बारा वर्षा नंतर परत जांबस येऊन ज्यष्ट बंधूस भेटले. नंतर शा० श० १५६६ त स्वामी कृष्णाती- री रहाण्याकरितां आले.. जयरामस्वामी वडगांवकर, तुकाराम गडाकर, रघुनाथस्वामी नासिककर, आनंदमति ब्रह्मनाळकर मारया दव चिचवडकर, धरणीधर देव, केशवस्वामी भागानगरकर, वामन पाडत कारगांवकमठेकर, विठ्ठल कवि बीडकर, शिवरामस्वामी कल्याणाकर, व अनंत कवि हे स्वामींचे समकालीन होते. नरसोमलनाथ अंबारखाने मामलेदार, व आनंदराव देशपांडे यांनी समर्थांस चांफळांत मठ करून दिला. मसूर येथे श्रीरामनवमीचे उत्सवास शा० श० १५६७ त पार्थिवनामसंवत्सरी स्वामींनी आरंभ केला. चाफळ येथे रामाची स्थापना होऊन शा० श० - १९७० त सर्वनामधारीसंवत्सरी उत्सवास आरंभ झाला. याच वर्षी चिंचवडकर देव, तुकोबा, व स्वामी यांची एकपंगत झाली. शिवाजीमहाराज माहुलीस असतांना त्यांस स्वामींनी

  • यापैकी जयराम स्वामी, रंगनाथस्वामी, आनंदमूर्ती, केशवस्वामी, व रामदासस्वामी

मिळून रामदासपंचायतन मानीत असत. करवीर. परशुराम क्षेत्र, महाबळेश्वर, पंढरा, गोदाप्रदक्षिणा गरे तायें करून स्वामी बारा वषा.