पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४) श्रीरामदासकृत म्हणे त्यासि पाहा बरें रावणारी । उभा राहिला शीघ्र कोदंड-धारी ।। विरश्री बळे बाणिली दिव्य शोभा । रणामंडळी ठाण मांडूनि ऊभा ।। ६३ ॥ पुढे राघवे ओढिला बाण जैसा । वदे आदरे वीर सौमित्र तैसा ।। पहावे घडी येक रौंजीव-नेत्रे । वधीतो वळे दैत्य मुहूर्त-मात्रे ।। ६४ ।। पुढें पावला तो अती चंड काया । बहू बोलती येकमेकां छळाया ।। तया येकमेकांस निर्वाण जाले । शरां सोडिलें व्योम संपूर्ण केले ।। ६५ ।। शरा तोडिती एकमेकां विरांचे | पुन्हा मागुती भार येती शरांचे ।। बळें भीडती बाणबाणास कैसे । पडो लागती छेदिले सर्प जैसे ।। ६६ ॥ शरी राक्षसे व्योम संपूर्ण केलें । विरें लक्ष्मणे शीघ्र छेदनि नेले ॥ रिपू कोपला मागुते बाण सोडी । बळें वीर सौमित्र तात्काळ तोडी ॥ ६७ ।। 'पुढे वीर रामानुजे ते चि काळीं । नभी मंडपू घातला बाणजाळी ।। किती चकले भार येतां शरांचे । 'देहे खोंचले एकमेकां विरांचे ॥ ६८ ॥ विरश्री-बळे दुःख नाहीं तयाचें । नभी पाहती देव कौतूक त्यांचे ॥ दळे योकली युद्ध होतां खणाणां । तया मस्तक डोलवी रामराणा ।। ६९ ॥ भला राँवणी वीर हा चंडदेही । दुजा मानवी वीर सौमित्र तो ही ।। महावीर दोघे रणामाजि कैसे | बळे मातले भीडती काळ जैसे ।। ७ ०|| पुढे शीघ्र सौमित्र तो वज-ठाणे । बळे तोडिले शीर चंद्रार्ध-बाणे ।। रणी पाडिला तो अती चंडकाया । बळे लागले दैत्य मागे पळाया ।। ७१ ।। बहूसाल ते मृत्युपंथेचि गेले । परी अल्प घायाळ मागे पळाले ।। पुरी माजि नाऊन लंकापतीला । भये सांगती सर्व संहार झाला ।। ७२ ।। बहू झुंजता झुंजतां भग्न बाले । रणी सर्व ही पुत्र-मंत्री निमाले । नरां वानरांला जयो प्राप्त जाला । क्षयो राक्षसां शीघ्र टाकनि आला ।। ७३ ।। पुढे रावणू तो भुमी अंग घाली । तया ऐकतां मूर्छना शीघ आली ।। शरीरी नसे शुद्धि सर्वे उडाली । बहू दैन्यवाणी दशा प्राप्त जाली ।। ७४ ।। करी रावणू शोक शंकारहीतू । सभा मंडपी धांवला इंद्रजीतू ॥ पिता शीघ्र आलिंगिला मेघनादें । ह्मणे काय जी शीणतां व्यर्थ खेदे ।। ७५ ।। बहूतां परी ननक शीकवीला । म्हणे शीघ्र मारूनि येतो रिपूला ।। तेणे रावण शोक सांडूनि ठेला । बहूसाल सन्मानिले त्या सुताला ॥ ७६ ॥ बहू दीस होती गळां रत्न माळा । तये पाहतां मोल थोडें भुगोळा ॥ करी घेतली माळिका आवडीने । सुताच्या गळां घातली ते त्वरेने ।। ७७ ।। ६१. कोदंड-धनुष्य. ६२. राजीव कमल. ६३. मुहूर्त अत्यल्प काळ. y. 'बळे 'पा० मे०.६१. रावणी-रावणाचा पुत्र, ६५. जनक-बाप (रावण).z. " राबणाने ' पा० मे..