पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांउ, (३३) निघाले बळें भार साही नणांचे । महावीर ते गर्जती विक्रमाचे ।। रणामंडळी पारखे वीर कैसे । दळेशी बळे धावती काळ जैसे ॥ ४८॥ महा मार दोही दळी एक जाला । कपी वीर राक्षेस कीती निमाला ।। पुढे वानरी घोर घातें निघातें । रणी भन्न केले तयां राक्षसांते ।। ४९॥ जयां देखतां लोटला दिव्य घोडा । नरां अंतकू कोपला वीर गाढा ॥ बळे हाणतां शस्त्र वाजे घडाडां । तुटों लागले पादपाणी यडाडां ।। ५० ॥ बहू वेग संहारिती सर्व सेना । कपी पाहती अश्व कोठे दिसेना ।। पुढे पाहता पाहतां लाग वेगी । अकस्मात ते आदळे खङ अंगीं ॥ ५१ ।। बहू साल तेणे Vतया वानरांच्या । ग्रिवा कापिल्या थोर माहा विरांच्या ।। कपी-वाहिनीचा रणी आट नाला | Wभुमी लोटिले शोणिते पूर आला ॥ ५२ ॥ कपी वीर ते खोचले भन्न जाले । महा मार देखोनि वेगें: पळाले । कितीएक ते सुनिया आड गेले । पुढें अंगर्दै सर्व ही स्वस्थ केले ॥ ५३॥ उणे देखिलें धांवला शीघ्र कोपें । बळें ताडिला अश्व तो वज-थापे ।। नरा-अंतकाला रणी अंत आला । बह मेद-मांसे भुमी गाळ जाला ॥ ५४॥ नरा-अंतका मारिले अंगदानें । पुढे वीर ऊठावले घोर त्राणे ।। रणामंडळा माजि ते शीच आले । तया अंगदा ही कपी साह्य जाले ॥ ५५ ॥ करी नीळ तो युद्ध माहोदराशीं । महा वीर देवांतकू मारुताशी ।। भिडे त्रीशिरा पार्श्व तो ऋषभेशी | बळे झुझती चौघे तीघां जणांशी ।। ५६ ॥ पुढे मांडिला थोर संहार तेथें । रणी माजली तें बहूसाल प्रेते ।। महावीर ते धीर संग्राम- सेरें । बळे धांवती एकमेकां पुढारे ।। ५७ ।। विरश्री बळें दूर टाकूनि शंका । रणी हाणती घाय ते येकमेकां ।। महा योर संग्राम साही जणांचा । पुरीं पूरला अंत त्या राक्षसांचा ॥ ५८॥ गजारूढ माहोदरू त्या निळाने । रणामाजि देवांतकू मारुतीने ।। महा वीर पारश्व त्या ऋषभाने । रणी झुंजतां पाडिले थोर माने ।। ५९ ।। बळे कोपला तो अती चंडकाया । रथ लोटिला शत्रु तेणें जिताया ॥ कपी वीर ते आडवे शीघ्र आले । पुढे चालतां सर्व ही भग्न केले ॥६ ॥ रथीं बैसला पर्वता सारखा तो । म्हणे राम हा कोण युद्धास येतो ॥ वदे शीच बीभीषण रम्य वाचा । रघूनायका पुत्र हा रावणाचा ॥६१ ॥ सखा होय सौमित्र तुह्मांसि जैसा | अतीकाय तो मेघनादासि तैसा ॥ न लेखी कपी-वाहिनीचा उठावा । तुह्मीं की सुमित्रा-सुते हा वधावा ।। ६२ ।। 1. 'रिस' पा• भे.. . ' भुमीलागि शोणीत तो पूर भाला' पा० मे.. . मागें' पा.मे..