पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (२९) कपी राक्षसां थोर संहार जाला | निळे झोडिला पाडिला भन्न केला ॥ ९३ ।। पुढें रावण चालिला लाग वगें । तया लागि मंदोदरी नीति सांगे ॥ न मानीत तो चालिला आवरेना । बळे लोटली ते असंभाव्य सेना ॥ ९ ॥ महा वीर झुंझार ते भार आले । बहूसाल शृंगार-मंडीत जाले ।। बळे पुत्र-प्रधान मेळा मिळाला । रणामंडळा रावणू शीघ्र आला ।। ९५ ॥ बह त्रासिले सैन्य गोळांगुळांचे । रिप-बाण-जाळे बहू सैन्य खोंचे ।। महा वीर ते ही बळे भग्न केले । पळाले कपी राघवा आड गेले ।। ९६ ॥ बहू त्रासिलो राक्षसांचेनि बाणी । कपी-भार ते बोलिले दैन्य वाणी ।। चळे कांपती खोंचती देति धापा | बळे रक्षिं गा राघवा मायबापा ।। ९७ ।। तया देखतां राम कॉर्मक वोढी । पुढे शीघ्र सौमित्र तो हात जोडी ।। म्हणे वीर तो स्थीर व्हावे समर्थे । करी तो बळे भग्न त्या रावणाते ।। ९८॥ रणी रावणा वीर सामर्थ्य नेल |नटेनीळ माया तया भग्न केले ।। पुढे शीघ्र पाचारिले रावणाला । महा वीर सौमित्र युद्धा निधाला ।। ९९ ॥ सुमित्रा-सुता रावणा युद्ध आतां । पुढें देइजे आदरे चित्त श्रोतां ॥ म्हणे दास हा वीर कोदंड-पाणी । रणी रावणा लागि बासील बाणी ।। १०० ॥ प्रसंग ३ रा समाप्त. चवथा प्रसंग प्रारंभ. दशाशीर सौमित्र युद्धा निघाले । समारंगणीं वीर सन्मूख जाले ।। महा वीर संग्राम आवेश पोटीं । पुढे देखिलें येकमेकांसि दृष्टी ।। १ ॥ बहू साल धिःकारिलें येरयेरां | बहू सोडिली बाण-जाळे सरांरां ॥ दळी टाकिती थोर शस्त्रे शरांची । बळे तोडिती येकमेकां विरांची ॥ २ ॥ रणी भीडतां हाणिती एकमेकां । म्हणे रावणू वीर हा थोरु नीका ।। पुढे शक्ति काढूनियां ब्रह्मयाची | बळें सोडिली वोळि विद्युल्लतेची ।। ३ ।। शरे वारितां बैसली शक्ति अंगीं । रणीं वीर सौमित्र तो देह त्यागी ।। पढे धांवला रावणू शीघ्र तेथे । बळें ताडिता जाहला मुष्टि-घाते ।। ४ ।। तया देखतां मारुती कोप आला । अकस्मात तो व्योम -पंथीं उडाला ।। कठोरे करें ताडिले वजमुष्टी । मू लागला रावणू रक्त सृष्टी ।। ५ ।। रिपू रावणू मागुता शीव गेला । पुढे लक्ष्मणू ऊठला स्वस्थ जाला ।। u.साल' पा. भे०.३६ कार्मुक धनुण्य. a. 'लक्ष्मणू वीर' पा० भे०.३७. मीका चांगला. ३८. व्योम-आकाश.३९. वम-ओकू. १०, सृष्टि-प्रवाह.