पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८) श्रीरामदासकृत शिरे पाद-पाणी बहू मांस-माळा । धन खेटक भातड्या त्या विशाळा ।। ७८ ॥ गिधे श्वापदें ती असंभाव्य आली । स्वइच्छा बहू मांस भक्षू निघाली ॥ भुते सर्व ही औट कोटी मिळाली । बहूतां परीची बहू तृप्त जाली ।। ७९॥ पुढे जानकी बोलिली त्रीजटेशी । रणी पाडिले सर्व ही पवानरांशी ।। महा वीर ते कोण वेळा तयांते । म्हणे त्रीजटे दाखवीं सर्व माते ।। ८ ।। रणी त्रीजटा दाखवी जानकीशी | महा वीर ते पाडिले नाग-पाशी ।। दिसे राम सौमित्र तो ही निमाला । पढें जानकीने महा शोक केला ।। ८१ ॥ बहूतां परी जानकी शांत केली । तये त्रीजटा शीघ्र घेऊनि गेली ।। समाचार सांगे तया रावणाला । बना माजि आली सिता रक्षणाला ।। ८२ ।। कपी सर्व ही पावले मृत्यु-पंथू । जिती मारुती आणि नैर्ऋत्य-नाथू ।। जया लागि जाली दया राघवाची ।। पहाया तया शक्ति काळाारी कैची ।। ८३ ।। रणे शोधिली सर्व बीभीषणाने । विरां लागिं अश्वासिले थोर माने ॥ पुढे दृष्टिने पाहिले राघवाने । गरुडास्त्र नीरूपिले व्योम जानें ।। ८४ ॥ तया लागि प्रायोजिले शीघ्र पंथें । असंभाव्य झेपावले व्योम पंथे ।। उड्या घालिती पक्षिा कूळे झडाडां । बळे तोडिती सर्प कूळे तडाडां ।। ८५ ॥ विहंगी तिहीं सर्प संहार केला । कपी-भार तो मोकळा सिद्ध जाला ।। गिरी-शीखरी सर्व सेना घडाडी । त्रिकटा चळी घोष तेणे धडाडी ।। ८६ ।। म्हणे रावणू थोर आश्चर्य जाले । कपी चक्र ते सर्व निर्जीव केले ।। सुते वैरियां दाविली थोर ख्याती। रणी मागती ते कपी गर्जताती ।। ८७ ।। रणी शत्रु जिंकील धूम्राक्ष नामा । तया पाठवीजे प्रभु सार्व-भौमा ।। पुढे मंत्र ऐकोनका मंत्रियांचा । वदे शवण आदरे त्याशि वाचा ।। ८८ ।। म्हणे गा विरा शीघ्र तं ये प्रसंगी । रिपू लागि मारावया जाय वगी ।। अलंकार देऊनियां तोषवीला । महा वीर धूम्राक्ष युद्धा निघाला ।। ८९ ।। रणी वीर धूम्राक्ष तो वजदंष्ट्री । तिजा अंकपू चालिला भार पृष्ठी ।। रणामंडळी थोर संहार केला । पुढे राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला || ९० ।। बहू युद्ध केले तया राक्षसाने । महावीर धम्राक्ष त्या अंकपाने || . बळे दोघ ही मारिले मारुताने । रणीं वजदंष्ट्री' तया अंगदानें ॥ ९१ ।। महा वीर ते झुंजतां भग्न जाले । बहूसाल घायाळ धाके पळाले ।। तिहीं सर्व सांगितली युद्ध-वार्ता । तेणे शवणा मानशी थोर चिंता ।। ९२ ॥ रणी राक्षसांत क्षयो प्राप्त जाला | महस्तू पुढें शीच युद्धा निघाला ।। ३४ खेटक=ढाल. ३५ और-साडे तनि, . नागपाशी' पा. भ., . पक्षपाते 'पा. मे.. .'ऐकनियां' पा. मे बजटष्टी' पामे,