पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (२७) बहतां परी रावणे शीकविलो । वना माजि ते बीजटा शीघ्र गेली ॥६३ ॥ पुसे जानकी ते तया त्रीजटेला । सभामंडपी कोण वृत्तांत जाला ।। म्हणे त्रीजटा सोडि चिता स्वभावे । रणामंडळा राज आज्ञेस जावे ॥६४ ॥ अहो जानकी दुःख चितीन तूते । तरी देह माझा पडो वव-घाते ॥ म्हणे सोडि चिता सिते सर्व कांहीं । तया लंकनाथा जयो प्राप्त नाहीं ॥६५॥ सिता ऐकतां शोक सांडनि ठेली । तये त्रीजटेची बहू स्तूति केली ॥ पढे बसल्या शीघ्र दोघी विमानी । रणामेदिनी पावल्या घोरवाणी ।। ६६ ।। पुढे पाहतां लक्ष कोटयान कोटी । रणी पाडिले हुंबती वीर नेठी ।। धडे तूटली राक्षसां वानरांची । शिरें दाटली घोर माहा विरांची ।। ६७ ॥ भयासूर हा घोर संहार जाला । रणी राक्षसां वानरां अंत आला ॥ असंभाव्य उत्पाटिले वक्ष जैसे | रणों भग्न केले महा वीर तैसे ।। ६८ ।। असंभाव्य ते तूटले पादपाणी | घडे मस्तके थोर विक्राळवाणी ॥ बह जाहली मेदैमांसे चिडाणी । महा दर्प ते माजली वरढाणी ।। ६९॥ रणीं येक ते छेदिले सर्व अंगी । तेणे काळिजे दीसती पृष्ठि-भागी।। शिरें तोडिली मेंदु नीघे बरारां । बह घाय ते रक्त वाहे झरारां ॥ ७० ॥ कितीएक ते वीर जाले उताणे । किती पालथे दीसती दैन्य वाणे ।। कितीएक ते वीर घालनि मेटें । भुमि पीटिती थोर दुःखें ललाटे ।। ७१ ॥ कितीएक भूमी बमीती अँशुद्धे । कितीएक ते मोडले माज मध्ये ।। कितीएक ते वीर चौरंग जाले । कितीएक ते दूधडो भग्न केले ।। ७२ ।। कितीएक ते मुंडकीहीन जाले । कितीएक वक्षस्थळी चूर्ण केले ।। कितीएक ती तुटली जानु घोटीं। कितीएक ते कंठ बोटी ललाटी ।। ७३ ॥ कितीएक वोटारिती तीव्र डोळे । निघाले बहू पोटिंचे मांस-गोळे ।। पिते चारटे फोफसे रक्त मेंदू । शिसे० आंतडी कातडी मूळ कंदू ॥ ७४ ।। कितीएक जाली शिर चूर चैदा । बहू दाटलासे रणीं रक्त-रेदा ।। कितीएक हुंकारिती दैन्यवाणी । कितीएका ते मागती अन्न-पाणी ।। ७५ ।। कितीएक ते खूडिती पाद-पाणी | कितीएक ते शब्द कारुण्य वाणी | कितीएक ते दंशिती भूमि दंतीं । कितीएक ते लागले मृत्यु-पंथीं ।। ७६ ॥ शिरें राक्षसांची धडे वानरांची । रणी लागली एकमेकां विरांची ।। विरा शकटा कुंजरां-घोडियांची । रिसां वानरां सर्व इत्यादिकांची ।। ७७ ।। नदी शोणिताचे महापूर जाती । धडे कोथळे फूगले वाहताती ।। ३२ मेद चरबी. ३३ अशुद्ध रक्त. 0.किली' पा. भे.. p. घोरची' पा० भे..