पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६) श्रीरामदासकृत विरे सनिवे क्षिप्र भट्टांशि द्वंदें । बळे झोडिले वच मुष्टीस मैदें ॥ ४८ ॥ द्विवादा करें वनस्पर्श निमाला | नळे ताडिले शौच प्रातीपनाला ।। रणी लक्ष्मणे भेदिले वीरुपाक्षा | चतुर्थाशि रामे शरे एक शिक्षा || ४९ ॥ दळी राक्षसांचे हाहाकार जाला | दळेशी बळे वीरुपाक्ष निमाला || कपी राक्षसांची बहूसाल सेना । रणी माजले युद्ध ते वोहटेना ।। ५० ॥ निशी प्राप्त जाली रणी घोर मारें । महा वीर ते झुंझती अंधकारें ।। बळे हाणती कोण कोणा कळेना । विरश्री-बळे मातले ते ढळेना ॥ ५१ ॥ पुढे शीघ्र चंद्रोदयो शुद्ध जाला | दिसो लागले राक्षसां वानरांला ॥ रिपू हाणती येक मेकां कडाडां । नद्या वाहती शोणिताच्या भडाडां ॥ ५२ ॥ nकपी वीर चंद्रोदयाच्या उजेडें । बळें हाणती एकमेकां निवाडें ।। दळे भांडती राक्षसां वानरांची । असंभाव्य भ्यासूर प्रेते विरांची ।। ५३ ।। कपी तापले कोपले वीर जेठी । बळें ताडिले दैत्य कोट्यानकोटी ।। समारंगणी आटली सर्व सेना । रणी राक्षसां येश येतां दिसेना ॥ ५४॥ क्षयो प्राप्त जाला बहू राक्षसांते । पुढे युद्ध आरंभिले इंद्रजीतें || दिसे पाहतां सर्व ही येश गेलें । तया राक्षसे शीघ्र कापट्य केले ॥ ५५ ॥ अकस्मात तो इंद्रजीतू उडाला । नभोमंडळी वणी गुप्त जाला || पुढे घोर नीशाचरे ते चि काळीं। कपी पाडिले सर्व ही सर्प-जाळी ।। ५६ ॥ बहू सर्प झेपावले व्योम-पंथें । बळें धांवती वानरी सैन्य जेथें ।।। महा काळ कर्कोट नाना परीचे । रणी पाडिती भार गोळांगळांचे ।। ५७ ।। कपींची पडों लागली सर्व सेना | पुढे पाहतां युद्ध-कर्ता दिसेना ।। गमे सर्व आकाश व्याले विखारी । बळे झोंबती सर्प-कूळे जिव्हारी ।। ५८ ।। कपी-भार ते सर्व निर्जीव जाले । निचेष्टीत ते राम-सौमित्र केले ॥ रिपू पाडिले थोर आनंद जाला । पुढें शीघ्र लंकापुरी माजि गेला ॥ ५९॥ नमस्कारिला राव तो आदरेशी । तेणे पुत्र आलिंगिला सौख्य-राशी ।। अती आदरे सुंदरें रम्य सारे । पिता अंगिची दे' अलंकारचीरें ।। ६० ।। म्हणे हो रणी शांति केली रिपूची । बळे सर्व ही त्या रिसां वानरांचा ।। बहूतां परी राव संतोषवीला । निरोपें चि तो भूवना माजि गेला ।। ६१ ॥ बहू सूख जाले तया रावणाशीं । तेणें शीघ्र पाचारिले त्रीजटेशी ।। म्हणे हो विमानी सिता बैसवावी । रिप मारिले शीव तेथे चि न्यावी ।। ६२ ॥ रणी पाडिले ते तये दाखवावे । सिता वीट मानील ऐसे करावें ॥ m. 'प्रेतानलाला' पा० भे०. n, "रणी' पा० भे०, २८ रावणी रावणाचा पुत्र. २९ गोलांगुल-वानर, ३० व्याल साप. ३१ चीर-वस्त्र.