पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. कपी कोपले गर्जती युद्ध काळी । शिळा टाकिती पाडिती दुर्ग-पोळी ॥ गिरी हाणिती योर नेटें धडाडी । बळे लागतां दिव्य लंका घडाडी ॥ ३४ ॥ त्रिकुटाचळी लोटली सर्व सेना । असंभाव्य ते भार लंका दिसेना ।। कपी क्षोभले गर्जती काळ जैसे । दळेशी बळे धांवती वीर तैसे ।। ३५ ॥ दळे पायिंची थोरी अश्वा गजांची । रणी चालिली दाट थाटें रथांची ।। बह भार शंगारिले राक्षसांचे । महा वीर ते घोर नाना परीचे ॥ ३६ ।। रणी पातली ते i भयातूर सेना । रजे मातली चंद्र-सूर्यो दिसेना ।। बहू साल वाद्ये बहूतां परीची । महा कर्कशे वाजती राक्षसांची ।। ३७ ।। समारंगणी चालिल राजभारे । दळे दाटली वानरांची अपारें ।। बळे हाणिती येकमेकां धबाबां । झरे लागले शोणिताचे थबाबां ।। ३८ ॥ पुढें धांविले पायिंचे शस्त्रधारी | जयां देखतां रोम आंगी थरारी ।। कपी राक्षसांते महा मार जाला । तेणे शोणिताचा नदी पूर आला ॥ ३९ ॥ रणी तोडिती वीर वीरां धसासां । भगाडे बह पाडिती ते घसासां ।। बळे टोचिती शूळ पोटी भसासां । शिरें फोडिती मुष्टि-घातें ठसासां ॥ ४० ॥ पुढें झुंझतां भार तो मृत्यु पावे | करीती बळे वीर मागें उठावे ।। कपी कोपले थोर काळाग्नि जाले । रिपू पायिंचे सर्व ही भग्न केले ॥ ११ ॥ निमाले रणी देह त्या पार्थिच्यांचे । बळें ऊठले भार त्या रोउतांचे ॥ देहे टाकिती झंझती स्वामि-काजा । पढें धांवती वीर मागील फौजा ।। १२ ।। कपी इंझता भंगल्या अश्व-याती । रणी लोटलीया बळे भद्रजाती ॥ गिरी सारिखे थोर कीकोट घोचे । गजी वानरां त्रासिले हो विशेषे ॥ ४३ ॥ कपीराज ते हाणिती मत्त हस्ते । बळे झोडिती कुंजरें खस्त व्यस्ते ।। दळे पायिंची अश्व-रत्ने अपारें । रणी पाडिली कुंजरें थोर थोरें ॥ ४ ॥ कळेना महा मार त्या वानरांचा । रथी) थोर संहार केला गजांचा ।। तया पृष्ठिभागी पुन्हा भार आले | रिपू वनारी सर्व संहार केले ॥ ४५ ।। पुढे चालिले भार नाना रयांचे । बहू बाण जाळे कपी-सैन्य खोंचे ।। रणी धांवती चक्र चाली घडाडां । करी टाकिती चंडशीळा धडाडां ।। ४६ ।। • रथी सारथी सर्व ही चूर्ण केले । महा वीर ते भार मागूनि आले ॥ रणी राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला । जयो वानरां शीघ्र टाकून आला ॥ १७ ॥ रणी मारुते पाडिला जंबमाळी । सखेणे विदूणा पढे ते चि काळी ॥ h. अश्वरत्ने' पा० मे०. i. 'भयासूर' पा० भे०. २३ शोणितरक्त. २१ रोम- केश, लोम, कांटा. २५. राउत-घोडेस्वार. २६ भद्रजाती-हत्ती. २७ कुंजर हत्ती j.रणी' पा० मे०. k. कपी 'पा. मे०. 1. 'मागुनी शीन' पा० मे०,