पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

... श्री. श्रीरामदासस्वामींचें चरित्र. अकिंचन वरेण्यऽपि समर्थपषों गतः । दासोऽपि यः किल स्वामी स साधुः कोऽपि राजते ।। ३३२।। पंतविठ्ठल रुते सुश्लोकलावे. श्रीरामदासस्वामींचे २२ वे पूर्वज कृष्णाजीपंत ठोसर, - जामदग्न्य गोत्री आश्वलायन देशस्थ ब्राह्मण, हे बेदर येथे राहत असत. ते शा० श०८८४ या वर्षी गोदेच्या उत्तरतीरी मौजे हिवरे तर्फ तालखेड प्रांत बीड येथे सहकटंब येऊन राहिले. यांस पांच पुत्र होते. पैकी ४ बेदर एथे झाले होते व पांचवा दशरथपंत ऊर्फ दादोपंत हा हिवरे एथे जन्मला. चवां वंडील पुत्रांनी गोदेच्या उभय तीरी राक्षस भुवनादि ४८ गांवची वसाहात करून तेथील कुळकर्ण व ज्योतिष या वृत्ति मिळविल्या. दशरथपंत हे प्रौढ झाल्यावर त्यांनी आंबेड प्रांतापैकी वडगाव म्हणून एक गांव हिवन्यांपासून तीन कोसांवर होते तेथे वसाहात करून त्या गांवास जांब असे नांव देऊन त्या गांवा सुद्धा बारा गांवची कुळकर्ण व जोसपण यांची वृत्ति संपादिली. हे दशरथपंत शा० श० ९१० । सवधारीनाम संवत्सरी जांबेस येऊन राहिले. यांस सहा पुत्र झाले. त्यांत वडील रामाजीपंत म्हणून होते. प्रत्येकाने दोन दोन गांव आपल्या हिंशास घेऊन तेथील वृत्ति चालविली. कृष्णाजीपंतांपासून नववे पुरुष गणेशपंत यांचे कार- कीर्दीत विद्यानगरचे अधिपति रामराजे यांचे राज्य बुडाले. नंतर २२ वे पुरुष सूर्याजीपंत यांची स्त्री सी० राणूबाई हिचे पोटी शा० श०.. १५२७ विश्वावसुनामसंवत्सरी मार्गशीर्ष शु० १३ गुरुवारी एक पुत्र नन्मला त्याचे नांव गंगाधर ठेविलें व दसरा शा० श. १५३०. कीलकनामसंवत्सरी चैत्र शुद्ध १ रविवारी दोन प्रहरी जन्मला त्याचे नांव नारायण असे ठेविलें. हाच पुढे रामदासस्वामी या नावाने प्रसिद्धीस आला. वडील भावास श्रेष्ठ ऊर्फ रामाराम- दास असे पुढे म्हणूं लागले व धाकटमस समर्थ असे म्हणू लागले. रामदासस्वामींचे मामा भानजा गोसावी. बोधलापूरकर हे पैठणचे एकनाथस्वामी यांचे शिष्य होते. भानजी गोसाव्यांची बहीण सौ ० राणूबाई ही उभयतां पुत्रांस पैठण येथे नाथांचे पायांवर घालण्याकरितां गेली तेव्हां त्यांस पाहून 'नाथांस मोठा संतोष वाटला. नंतर शा० श. १५३१ फाल्गुन वद्य ६ स नाथ परलोकवासी झाले. गंगाधराचा व्रतबंध ५ वे वर्षी झाला व लग्न सातवे वर्षी झाले. नंतर शा० १. इ. स. १५६५ ह्म-शाश० १९८७