पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४) श्रीरामदासकृत कपीने सभा सर्व अमान्य केली । पुढें रावण लक्षिला भेटि जाली ।। मनी पाहातो तो रिपू *उच्च होतो । महापुच्छसिंहासनी बैसला तो ॥ १९ ॥ रिपू सर्व ही बैसले स्तब्ध जाले । तयां लागि हा अंगदू काय बोले ॥ पुढे बोलता बोलतां येरयेरां । बहूसाल धिःकारिलें थोरथोरां ॥ २० ॥ बहूतां परीच्या बहू शब्द-याती । महा वीर तोडागळे गर्जताती । रिपू घोर तो आपुलाल्या वैगरें । बळे मातले हाणिती शब्दशस्त्र ।। २१ ॥ बहू बोलती बोल नाना परीचे । महा युक्तिचे भक्ति संख्या रसाचे ॥ तया बोलतां मातला शब्द-सिंधू । असंख्यात संख्या नसे तो अंगाधू ॥ २२ ॥ बहूतां परी रावण बोधवीला । परी नायके मानसी गर्व केला ॥ ह्मणे काय रे पाहतां घ्या कपीला । महा वीर तो अंगदू आक्रमीला ॥ २३॥. कपीने बळे योर उड्डाण केले । सभामंडपा मस्तकी शीघ्र नेलें ॥ रिपू घोर ते ही भयातूर जाले । घिराचे बहू स्तंभ झोके उडाले ॥ २४ ॥ विरे अंगदें त्रीकुटी ख्याति केली । नभी अंतराळी बळे झेंप गेली ॥ बळाचे भुजी मल्ल राक्षेस कैसे । गळाले तळी मारिले सर्प जैसे ॥ २५ ॥ पुढे अंगद् भेटला रामचंद्रा । नमस्कारिलें आदरें त्या नरेंद्रा ।। कपी सिर्व ही तो समाचार सांगे । म्हणे शत्रुचा गर्व-ताठा न भंगे ।। २६ ॥ बहू बोलिलो जी तया रावणासी । परी नायके मातला गर्व-राशी ।। भिजेना जळा माजि पाषाण जैसा । धरीना मनी सांगतां शब्द तैसा ।। २७ ।। बहूसाल त्या रावणे गर्व केला । रघुनायका कोप तात्काळ आला || म्हणे राम गा सुग्रिवा ये प्रसंगी । त्रिकूटाचळू पालथा घालिं वेगीं ॥ २८ ॥ कपीद्र वदे शीन सेनापतीला । निळे सर्व सैन्यास संकेत केला ।। बळे चालिली ती दळे वानरांची | अयूधे करी शैल-शंगादिकांची ।। २९ ।। कपी क्षोभले गर्नती मेघ जैसे । बळे भार ऊठावले शीघ तैसे ॥ महा घोर घोषे भुमी-कंप जाला । त्रिकूटाचळा थोर कल्पांत आला ॥ ३० ।। हुडे कोट आटोपिले लंकनाथे । कपीमार झेपावले व्योम-पंथे ।। महायुद्ध आरंभिले येकमेकां । बळे घेतली वानरी शीव लंका ॥ ३१ ।। त्रिकूटाचळी वानरी बेग केला । कपीराक्षसांते महामार जाला || बह कोपले वीर ते चंडकोपा । बळे हाणिती मस्तकी वजथापा ।। ३२ ।। ग्रियों तोडिती मोडिती पंजैराते । कपी झोडिती पाडिती वृक्षघात ।। रिपू भांडतां थोर आवेश पोटी । बळे वोढिती हात घालोनि "झोटीं ॥ ३३ ॥

  • "तुच्छ' पा. भे०.१० वगन, वक्त्र-तोंड, १८ अगाध खोल. f. वर्तला' पा०

भे०.१९ बीबा-मान, कंड. २. पंजर-हाडांचा पिंजरा.g.भीडती' पा० भे०. २१ झोटी शेंडी, केश.