पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकार, (२३) उभा रावणू गोपुरी योर धीट । तिथे पावला सुग्रिवाचा चपेट ॥ ३ ॥ कवे घातली पेटला शीघ कोपा ! बळें रावण ताडिला चंड धापा ॥मान वळे झोडिली तोडिली दिव्य छत्रे । म्हणे जानकी आणिली या कुपात्रे ॥४॥ पुढे देखतां रावणा कोप आला | पदी झाडिले ताडिले सुग्रिवाला || मदें मातले दूर टाकून शंका | कळा लाविली नीकरें येकमेकां ॥५॥ बहू कोपले मल्ल-युद्धासि आले । रिपू भीडतां अंग अंगी मिळाले || बळे हाणिती पृष्ठिसी वज मुष्टी । दणाणीतसे त्रीकुटी सर्व सृष्टी ।। ६ ॥ विरश्री-बळे वीर झोबीस आले । झडा चांचरा भूतळा माजि गेले ॥ पुढे रावणे देह संकोचवालें । अनर्थास भीऊनि गंतव्य केले ॥ ७ ॥ कपीनाथ तो येश घेऊनि आला । रिप-गर्व हो सर्व ही भग्न केला ॥ नमस्कारिलें राघवा ते प्रसंगी। कपी-भार ते सर्व आनंद-संगी ॥८॥ कपीशी सुवेळाचळा राम आला । असंभाव्य तो वीर-मेळा मिळाला || दळे e भतळी लोटले भार सैरा । पुढें आणिले राज-नीती विचारा ॥ ९ ॥ कपी शोधितां शोधितां लक्ष कोटी । तया माजि हा अंगद वीर जेठी ।। बळे आगळा दक्ष चातुर्य जाणे । वये अल्प लावण्य तारुण्य बाणे ॥१०॥ स्तुती-उत्सरी राम बोले तयासी । म्हणे धन्य गा अंगदा गूणराशी ॥ मिळालासि तं आमुच्या स्नेह-वादा । विवेके तुवां सोडिले पित द्वंदी॥ ११ ॥ बहतां परी राघवे गौरवीला । तेणे शोभला शीच ऊदीत जाला ॥ प्रती-उत्तरे अंगर्दै स्तुति केली । उभा दृष्टि हे राम-पायीं च ठेली ।। १२ ॥ पुढे आपुला विक्रम वाड बोले । महावीर ते सर्व चक्कीत जाले ॥ तया अंगदा थोर आवेश आला । तेणे राघवा थोर संतोष जाला || १३ ॥ म्हणे रामराणा तया अंगदासी । त्रिकूटाचळी भेटरे रावणासी ।। तया सांग रे भीम पूर्थि माझा । वदे सर्व संहारिशी कोण काजा ॥ १४ ॥ प्रसंगोत्तरें अंगदा त्वां वदावें । बहूतां परी रावणा बोधवावें ।। सिताकारणी युद्ध मागून घ्यावें । परी शेवटी भाग तोडून यावें ।। १५॥ नमस्कारिलें त्या रघूनायकाला । समस्तांसि सन्मानिले सिद्ध जाला ॥ कपी राम आशेसि घेऊनि माथां । उडाला बळे चालिला "व्योम-पंथा ॥ १६॥ नमा माजि झेंपावला वेग केला । बळे शीघ्र लंकापुरीमाजि गेला ।। अकस्मात खालावला व्योम-पंथें । रिपची सभा बैसली भीम जेथे ॥ १७ ॥ पढ़ें पावला तो सभेमाजि कैसा । कपी राक्षसां भासला काळ नैसा ॥ रिप शस्त्र-पाणी बळे सिद्ध जाले । उगे सर्व कोणासि कोणी न बोले॥१८॥ 8. 'य' पामे.. १५ इंद-तंटा. १६ व्योम आकाश,