पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) श्रीरामदासकृत मनी माझिये वाटते निश्चयेशों । रघूनायका भेटवावे सितेसी ॥ ८९ ॥ समाचार तो सर्वही श्रूत केला । तया सांगतां रावणा क्रोध आला ॥ पढें राक्षसे शीर केले रिपूचे । वनी चालिला सत्व घ्याया सितेचे ॥ ९० ॥ अशोकीं वसे जानकी भूमि-बाळा । वदे रामनामावळी सत्वशीळा ।। पहा रावणे शीर मायीक केले । छळाया सिते कारणे शीच नेलें ।। ९१ ॥ म्हणे रावण व्यर्थ त्वां धीर केला । रणी दोर भर्तार तूझा निमाला ।। कपी राक्षसांते महा मार जाला । प्रहस्तू जयो शीघ्र घेऊनि आला ।। ९२ ।। रिपू सांगतां ते भयातूर जाली । भये जानकी शोक-सिंधू बुडाली || शिरें देखतां मूर्च्छना शीघ्र आली | देहे सांवरेना भुमी अंग घाली ।। ९३ ।। भविष्योत्तरे b बोलिली वाल्मिकाची । म्हणे कायसा बोलिला तो बिरिची ।। पहा आजि ते सर्व ही व्यर्थ जालें । कृतांतापुढे मयका येश आले ।। ९४ ॥ बहू शोक होतां देहे-भाव सांडी । म्हणे रावणू d सत्त्व सीता न सांडी ।। महा प्रेत्न सायास म्यां व्यर्य केला । पुढें शीव लंका-पुरी माजि गेला ।। ९५ ।। दळे सिद्ध केली बळे लंकनायें। प्रती-मल्ल राक्षेस चत्वार पंथें ॥ महा वीर ते सर्वही शस्त्रपाणी । बुजू पाहती भूमि आकाश बाणी ।। ९६ ।। कपी-चक्र ते ही बळे सिद्ध नाले । निळे वानरेशी प्रतीमल्ल केले ॥ महा वीर ते गर्जती मेघ जैसे | भुतां, खेचरां थोर कल्पांत भासे ।। ९७ ॥ सुवेळाचळा राम पाहे स्वभावे । तया मस्तकी शंग ते दोन गांवें ।। नभी लागला उंच आकाश-पंथें । म्हणे राम गा सुग्रिवा जाई तेथें ।। ९८ ॥ म्हणे वीर सुग्रीव आज्ञा प्रभूची । असंभाव्य सेना रिसां वानरांची ।। महा वीर तात्काळ सर्वै मिळाले | बळे शृंग वेघावया सिद्ध झाले ।। ९९ ॥ कथे लागि श्रोती पुढे चित्त द्यावे । ह्मणे दास अर्थातरी वीवरावे ।। स्वहीता कथामत ध्यावे फुकाचे । सदां सेवितां दुःखदारिद्य कैचे ।। १०० ।। तृतीय प्रसंग. पढ़े चालिला शीघ्र तो राम राजा | कपी धांवती वीर वेष्टीत फौजा ।। करी हस्त घेऊनि बीभीषणाचा । बळे वेघले शंग त्या पर्वताचा ।। १ ।। कितीएक ते राहिले भार मागें । बळें वेघती शुंग तो लागवेगें || पुढे शीघ्र आटोपिले जात जातां । मिळाले कपी राम सौमित्र मायां ॥ २ ॥ सुवेळागिरी-शीखरी राम पाहे । अती साजिरा त्रीकुटू शोभताहे ॥ सिंध-समुद्र. b. सर्व ही' पा० मे०. १२ विरिंची-ब्रह्मा..मिध्य' पा. भे.१३ तांत=यम. 2 मश्यक-धुंगु.. d. — सत्य' पा. भे..