पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (२१) कपी राघवा वाम भागींच आहे | त्रिकूटाचळू दृष्टिने वक पाहे ।। कपीनाथ सुग्रीव तो ओळखावा । कळेना असंभाव्य त्याचा उठावा ॥ ७ ॥ कपी आणिले सर्व भूमंडळींचे । असंख्यात संख्या नसे भार त्यांचे ।। वनी मैत्रिकी जोडिली राघवाशी । रघुनायका साह्य जाला जिवेसी ।। ७५ ॥ सिता शोधिली मारिलें कूमरासी । वने मोडिली नाळिले त्रीकुटाशी ।। बळे आगळा भूपती पैल पाहें | समस्तां मध्ये मारुती शोभताहे ।। ७६ ॥ महा भीस भिंगोळ काळा कराळू । विशाळे नखे फोडितो ब्रह्मगोळू ॥ रिसां कर्कशां माजि हा काळ-केतू । वळे आगळा पैल जो जांबवंतू ।। ७७ ।। उतावीळ मारावया दैत्य पाहें । महा वीर बीभीषणू शोभताहे || तये सांगतां रावणा दुःख नालें । असंख्यात कोपानळे दग्ध केले ।। ७८ ॥ करी खंड घेऊनियां सारणाला । प्रसंगी तये शीच मारूं निघाला ॥ म्हणे सारणू जी पिडा का करीतां । मुखें बोलिलो सर्व ही सत्य वार्ता ॥ ७९ ॥ तुळाया दळे पाठवीले भुपाळे । रिपची दळे पाहिली ती विशाळें ॥ तया सारिखें बोलिलो सत्य भावे । समर्था पुढे मिथ्य कैसे वदावे ।। ८०॥ प्रभ आमचा काण अन्याय जाला । खरं सांगता काप यता तुह्माला ॥ नसे पाहतां अल्प अन्याय कांहीं । नसे मिथ्य आम्ही नसों स्वामि द्रोही ।। ८१॥ पुढे रावण कोप सांडून ठेला | पुसे आदरे मंत्र माहोदराला ।। सुवेळाचळा कोण रे पाठवावा । रिपचा विवेके बरा शोध घ्यावा ॥८२ ।। वदे वीरु माहोदरू रावणाते । सुवेळाचळा पाठवा शार्दुलातें ॥ महा धूर्त हा जाणतो सर्व मत्ते । बळे शीघ तूळील रीपू-दळाते ।। ८३ ।। पुढे दैत्य बोलाविला आदरेंशी । म्हणे सैन्य पाहोनि यावे त्वरेशी ॥ अलंकार देऊनियां तोषवीला । बळे हेरे तो शीघ जाऊनि आला ।। ८४ || नमस्कारिला राव तो आदरेशी | म्हणे रावण म्लान कां दीसतोशी ।। अधोमूख राहोनि शार्दूल बोले । म्हणे हो कपी काळ जैसे उदेले ॥ ८५ ।। बडू दाटलीसे असंभाव्य सेना | नसे रीघ सेथे कदां जाववेना ॥ परी मी तयांमाजि तैसाच गेलों । बहू ताडिलो पाडिलो कुस्त केलों ॥ ८६ ।। निरोपे तुझ्या शीघ्र गेलो सुरारी । रुपें जाहलो वानरू वेष-धारी ।। मला हिंडता हिंडतां थोर माने । पुढे लक्षिले धूर्त बीभीषणाने ।। ८७ ॥ कपी धांवले दूत त्या सुनिवाचे । पुरोहीत चत्वारि बीभीषणाचे ॥ धरूनी मला चालवीले त्वरेशी । पुढे चालतां देखिले राघवासी ॥ ८॥ म्हणे धन्य तो रामराजा दयाळू । मला देखितां शीघ्र सोडी नृपाळू ।। ९ केतु-निशाण, बावटा. १० खड्=तरवार.