पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०) श्रीरामदासकृत देहे सिधुरी सारिखा पैल पाहे | महावीर विंध्याचळामाजि राहे ।। सुपर्णास सांडून उड्डाण ज्याचें । W कपी योर हा ऋषभू नाम त्याचे ।। ६० ॥ दिसे पैल पुच्छासनी वीरभारें । खचे स्वर्ग तें याचिया भूभुकारे ।। पी शर्भ ऐसे तया नाम राया । उतावीळ हा थोर छात्र जिताया ॥ ६१ ।। कपी वीनतू पैल पाहा विशाळू । रणी धांवतां वीर-प्रेतां सुकाळू ।। देहे आचळा सारिखा ताम्रवर्णी । विसं वानरां माजि अद्भत कर्णी ।। ६२ ॥ भकूटी भयासूर त्या भीस पाहे । भुमी अंग रोमावळी रूळताहे ।। कपी फंदनू भूपती नाम उयाचें । तया सारिखें देह नाही बळाचे ।। ६३ ॥ प्रमाथी कपी वीर कैसा कडाडी । महा मेघ गंभीर जैसा गडाडी । रणी झंजतां थोर कल्पांत मांडे । तया वानरांशी बळे कोण भांडे ।। ६४ ॥ सुवर्णाचळो सारिखा देह ज्याचा । मुखें विक्रमू बोलवेना बळाचा ।। गवायू कपी वीर तात्काळ कोपे। उडाणे सवीतारथी अश्व कांपे ।। ६५ ॥ विशाळू गजू वानरू पैल पाहो । तुळीतो सदा सर्वदां सव्य बाहो ।। त्रिकूटाचळी लाविली दृष्टि जेणे । बळे सर्व रोमांच येती फाणे ।। ६६ ॥ विरांमाजि हा धूम्रचंड प्रतापी । महा पर्वता सारिखा xचंडकोपी । रिसू कर्कशू घोर घोषू अगाधू । बळी होय हा जांबुवंतासि बंधू ॥ ६७ ।। कपीचे बहसाल सामर्थ्य वानी । मखे बोलतां रावण वीट मानी ॥ म्हणे रावणू सारणा मूर्ख होशी । मज देखितां मर्कटां वर्णितोशी ।। ६८ ।। असोदे रिसे मर्कटें या प्रसंगी । रिपू दाखवीं मुख्य तो राम वेगीं ।। अभिप्राय जाणूनि लंकापतीचा । वदे सारणू मागुती रम्य वाचा ।। ६९ ॥ पहा ) राम तो पैल कोदंडे पाणी। रूपे सांवळा रम्य लावण्य-खाणी ।। रतीचा पती तूळतां तुच्छ होये । विराजे रिसां वानरां माजि पाहे || ७० ।। पहा राम विश्राम आत्मा जगाचा । बळे काळहर्ता - विहर्ता अघाचा ।। तुणीरों बरें कांस माथां लपेटा । झणत्कारिती वाजटा चीप-घंटा ।। ७१ ।। महावीर तो देखतां धाक सूटे । समारंगणी भीडतां काळ वीटे ।। तयाशी बळें भीडतां पूरवेना । कदां ही जयो प्राप्त होतां दिसेना ।। ७२ ।। तया दक्षणे दूसरा बैसला हो । महावीर सौमित्र राया पहा हो । असंभाव्य सामर्थ्य याचे कळेना | बळे आगळा जिंकतां जिंकवेना || ७३ ।। १०. सिंधुर हत्ती. १ सुपर्ण गरुड. W. ' तया सारिखें देह नाही बळाचे' पा. मे०. ३ सुवर्णाचळ=मेरुपर्वत. ३ विक्रम पराक्रम. x. 'काळरूपी' पा. भे०. वानी वर्णी. y. 'ह्मणे' पा० मे०. ५ कोदंडपाणी धनुष्य आहे हाती ज्याच्या. 2. विवर्ता' पा० भे०. ६ अध-पाप.. तुणीर-बाणांचा भाता. ३. वाजती' पा० भे०.८ चाप=धनुष्य,