पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड तुळा बा दळे ती शुका-सारणाहो | तुम्ही आपुले कार्य सिद्धीस न्याहो ॥४४॥ स्तुती उत्तरे सारणू शीच बोले । कृपा-सागरे हेर ते रक्षियेले ।।। प्रभू देइजे स्नेह आज्ञा दयाळा । तुज लागि कल्याण हो जी नृपाळा ॥ ४५ ॥ निरोपे चि तात्काळ ते हेर गेले । तया रावणाला नमस्कार केले । प्रभू मृत्यु आला बळे लागवेगें | परी सूटका जाहली प थोर भाग्ये ॥ ४६ ।। दळा माजि बीभीषणे ओळखीले । धरूनी बळे तें सभेमाजि नेले ।। उदार रघूनायके सोडवीले | कृपाळू-पणे भूपती मुक्त केले ।। ४७ ।। कळेना दळी कोण संख्या बळाची । असंभाव्य सेना बहू विक्रमाची ।। तयांच्या बळा ऊपमा काय द्यावी । समारंगणी भेटि त्यांची न व्हावी ॥ १८॥ रघूनाय सौमित्र बीभीषणाने । कपी सुग्रिनवे अंगदें मारुतीने । बळे घेउं लंका असा नेम केला | घडीने घडी कोप येतो तयांला ॥४९॥ मनी वाटते वृद्धि ऐशी करावी | सिता आदरे राघवा भेटवावी ।। तया बोलतां कोपला गर्वराशी । म्हणे ताडिले काय नेणों तुम्हांसी ।। ५० ॥ .. भया सांगतां त्या नरां वानरांचे । सदा सर्वदां भक्ष जे राक्षसाचे ।। मजे रावणा सारिखा कोण आहे । समारंगणी काळ भीडों न राहे ।। ५१ ।। महा थोर दामोदरी गर्यराशी । पुढें रावण घला सारणेशी ।। तया मस्तकी उंच आकाश-पंथीं । पुढें पाहतां दृष्टि फांके दिगंती ।। ५२ ।। सुवेळाचळी दृष्टि घालोनि पाहे । असंभाव्य तें सैन्य पोटी न साहे ।। पुढे रावणू सारणा लागि पूसे । कपी सांग रे सर्व आहेत कैसे ।। ५३॥ कपीभार पाहूनियां हेर आले । पुसे रावण सारणू शीघ्र बोले । वदे देखिल्या सारिखे सत्य वाचे । पुढे दाखवी भार गोळींगुळांचे ।। ५४ ॥ म्हणे सारण ते कपी वीर जेठी । मिळाले असंभाव्य कोट्यानुकोटी ॥ देहे पर्वता मारिखे काळ रूपी । रणी भीडतां शूर संग्राम कोपी ॥ ५५ ॥ म्हणे लंकनाथा कपी पैल पाहे । समस्तांमधे आगळा बैप्सलाहे || समारंगणी वीर नेता विरामौ । महा मुख्य सेनापती नीळ नामा ।। ५६ ॥ दिसे दूसरा त्याचिये दक्षिणांगी । बळे डल्लतू वीर लोहीत अंगीं ॥ धरा हाणतां पुच्छ-घाते थरारी । कपी अंगदू नाम त्याचे सुरारी।। ५७॥ मिळाले कपी रीस कोट्यानुकोटी । पुढे बैसला भार घालूनि । पाठी ।। सदा सर्वदां लक्ष ज्यांचे त्रिकूटीं । बहसाळ युद्धा उतावीळ पोटीं ॥ ५८ ।। करी चंड उड्डाण आकाश-पंथे । महा मेघ वीतूळती अंगवाते ।। समारंगणी भीडतां अग्रवादू । बळें आगळा नाम त्याचे कुमद् ॥ ५९॥ प. पूर्व पा० ०.८ गोलांगुल-वानर. :: विराममरण. V. “पोटी 'पा...