पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८) श्रीरामदासकृत बह कष्ट जाले प्रभो या जिवासी । नसो वोखंटी वेळ तो वैरियाशी ।। रिसों वानरांची असंभाव्य मांदी । पुढे घातले हो मला पाश-बंदी ॥ ३० ॥ प्रभू काय सांगो चमत्कार जाला । समुद्रांतुनी सिंधु बाहेर आला ॥ रुपे भव्य तो मर्तिमंतू निघाला । अती आदरें भेटला राघवाला ।। ३१ ।। पढ़ें बोलता जाहला तोय -राशी । तये शुद्धि सांगितली राघवासी ।। म्हणे जी बळें सिंधु बांधा दयाळा | नळाचनि हस्ते जळीं चंड शीळा।। ३२।। कपी प्रेरिले त्या रघूनायकानें । शिळा तारिल्या त्या नळा वानराने ॥ कपी भार ते सर्व ऐलाड आले । सुवेळाचळा मस्तकी ते मिळाले ।। ३३ ॥ कृपाळूपणे बोलिला रामचंदू । कपीला म्हणे शूक सोडा नरेंद्रू ॥ पुढे वानरी सोडिले लागवेगी । समर्था तुला भेटलो ये प्रसंगी ॥ ३४ ॥ प्रभू सांगतो बुद्धि आतां करावी । त्वरे जानकी राघवा भेटवावी । सिता पाठवीतां बरें लंकनाथा । न होतां असे प्राप्त होईल वेथा ॥ ३५ ॥ शुके सांगतां रावणा कोप आला । म्हणे कोण लेखा नरां वानरांला ।। रणामंडळी सोडितां बाण-वृष्टी । बळें आपुल्या सर्व जाळीन सृष्टी ।। ३६ ॥ बळे बजितो भामि आकाश वाणी। म्हणे काय ती लेकरें दैन्यवाणी ॥ न होता असंभाव्य त्या बाणवृष्टी । सुखे सांगती थोर संग्राम-गोष्टी ।। ३७ ।। अमित्री तिहीं एक अद्भूत केले । समुद्रासि पॉलाणिलें सैन्य आले ।। नव्हे पाहतां गोष्टि सामान्य कांहीं । परी राक्षसां शुद्धि अद्यापि नाहीं ।। ३८ ॥ पुढे हेर बोलाविले आदरेशी । शुका सारणाते म्हणे गर्वराशी ।। मिळाली दळे श्रावणारी-सुताची । तुळा रे बळें त्या रिसां वानरांची ।। ३९ ।। तये बोलिल्या नंतरे लंकनाथें । बळे चालिले शीघ्र आकाश-पंथे ।। सुवेळाचळा देखता सिद्ध जाले । दॆ हे आपुले ते तिही पालटीले ॥ ४० ॥ रुपे जाहले वानरू वेषधारी | कळेना कळा बाणलीसे शरीरी ।। दळी कोटिच्या कोटि संख्या असेना । तिहीं राक्षसी तूळिली सर्व सेना ॥ ४१ ॥ सभे बैसले राम-सौमित्र जेथें । शुका-सारणाला नव्हे रीग तेथें ।। पुढे अंतरी दूर राहून वेगीं । बळें तूळिते जाहले ते प्रसंगी ।। ४२ ।। सभे अंतरे लक्ष लावोनि ठेले । अकस्मात बीभीषणे ओळखीले ।। धरीले करी त्या शुका-सारणातें । म्हणे दूत हे धाडिले लंकनाथें ।। ४३ ।। तंव बोलिला राम बीभीषणाला । दळे दाखवा सर्वही शीघ्र त्याला ।। ११ वोखटीवाईट. ९२ मांदी मेळा.९३ तोयराशी=समद्र. t. ऐशी' पा० भे०. ११ लेखा हिशेब. ९५ अमित्र-शत्रु. १६ पालाणिलें खोगीर घातले पूल बांधला. १७ श्रावणारीसुत भावणनामक पुरुषाचा शत्रु दशरथ त्याचा पुत्र राम.