पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकोड. बळ सेतु बांधावया वेगु केला । शते योजने लांब विस्तीर्ण जाला ।। दर्श योजनें भव्य रुंदी तयाची । जळी बांधणी सर्व पांचां दिसांची ॥ १५ ॥ कपी सर्व आनंदले कार्य झालें । बळे गर्जती चित्त सूखे निवाले ॥ सुवेळाचळा सेतु बांधोनि नेला । नळा वानराला जयो प्राप्त जाला ।। १६ ॥ म्हणे रामराणा तया सुग्रिवातें । दळे चालवा सागराचेनि पंथें ॥ निरूपी कपी शीव सेनापतीला । निळे सर्व सेनेसि संकेत केला ॥ १७॥ दळे सर्वही वानरांची निघाली । पुढे चालतां दाटणी थोर जाली ॥ कडेचा पडे तो उडे अंतराली । मुवेळाचळा पावले शीघ्र काळी ।। १८ ॥ सुवेळाचळा भीतरी राजभारें । दळे लोटली वानरांची अपार ॥ बळे घोर घोघे कपी गर्जताती । दिशाचक्र सिंधू गिरी पाहताती ॥ १९॥ त्रिकूटागिरी-शीखरी दिव्य जे कां । रघूनायके देखिली रम्य लंका॥ दिसे तेज पुंजाळ लावण्यराशी । तया देखतां पारणे लोचनाशीं ॥ २० ॥ म्हणे धन्य रे धन्य तो विश्वकर्मा । असंभाव्य या पर्वताचा महीमा || सुवर्णाचळा सारिखा दीसताहे । सिता सुंदरी या स्थळा माजि आहे ॥ २१ ॥ पढ़ें राम बोले रिसावनिरांशी | असावें तुम्ही सर्व सेना-प्रदेशी ।। कपी-चक्र अव्यग्र ते सिद्ध जालें । निळे 8 वानरे सर्व संनद्ध केले ॥ २२॥ कपी-भार ते सर्वही स्वस्थ जाले | पुढे धर्मता उत्तरी राम बोले ।। म्हणे सुग्रिवा बापुडे शूक सोडा । तया पायिंचे सर्व ही पाश तोडा ॥ २३ ॥ तया अंगदें सोडतां तो उडाला । मुखी रामनाम नभी गुप्त जाला ॥ बळे चालिला मुक्त सूखे त्वरेशी । त्रिकूटाचळी भेटला रावणाशी ।। २४ ॥ म्हणे रावण गा शुका काय झालें । नव रात्र पर्यंत कोठे क्रमीलें ।। वदे शक हो लंकनाया वरिष्ठा । मुखे व्यर्थ बोलों नये अप्रतिष्ठा ॥ २५ ॥ तयां वानरांच्या दळामाजि गेलो । देहे पालटीले स्वये शूक नालों॥ नभोमंडळी राहिलो अंतराळी । बळे वानरांची दळे ती न्यहाळी ॥ २६ ॥ समद्राचिये उत्तरे भीम सेना । दहा योजने दाट भूमी दिसेना ।। तिथे मुख्य ते राम-सौमित्र बंधू । कपि-श्रेष्ठ सुग्रीव राजा अगाधू ।। २७ ।। उचिष्ठोत्तरें तूमची त्या कपीला । मुखे बोलिलो सर्व ही सुनिवाला ।। मला सांगतां वीर कोपासि आले । कितीएक ते पाठि लागी उडाले ॥ २८॥ कपी-वीर धांवोनिया पाठि लागी । मला ताडिते जाहले ते प्रसंगी ।।. बहू सूख जाले तयां वानरांतें । कठोरें करें ताडिले या "देहाते ॥ २९ ॥ ८६ विस्तीर्ण प्रशस्त. ८७ पारणे तृप्ति. ८८ रिस-आस्वल... सिद्ध'पा... 8. वानरेशी प्रतमि केलें'पा.मे..८९ सन्नद्ध-तयार.९० भीम भयंकर.-