पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत द्वितीय प्रसंग प्रारंभ. समुद्रातिरी राम राजीव-नेत्रे । भुमी सेज दर्भासनी तीन रात्रे ॥ बहूतां परी दीधला श्रेष्ठ मानू । परी सागरू तो नव्हे सुप्रसन्न ॥ १॥ फळे तोय सांडुनियां नित्य नेमें । बहूतां परी प्रार्थिला सिंधु रामे ।। परी नायके जो बळे धुंद नाला । रघूनायका कोप तात्काळ आला ॥ २ ॥ उभा राहिला काळ कृत्तांतु जैसा । बळे सिंधु जाळावया राम तैसा ।। दिसे रूप अद्भूत वजांग ठाणे । करी चाप ते सज्जिले अग्निबाणे ॥ ३ ॥ बळे ओढितां घोर-घोषे करारी । दिशा दाटल्या वन्हि शीतें थरारी ।। भये बैसला काळ-पोटी दरारा । mचवों लागल्या त्या असंभाव्य तारा ॥ ४॥ बहू क्षोभला राम जाळू निघाला । पुढे सिंधु भेटावया शीघ्र आला ॥ म्हणे स्वामि हो थोर अन्याय झाला । समुद्रासि हो शीघ्र पौलाण घाला ॥ ५ ॥ नळाचेनि हस्ते जळी चंड शीळा | गिरी शृंग तर्तील हो जी नृपाळा ।। चदे निश्चये आदरें हा समद्र । तेणे थोर संतोषला रामचंद्र ॥ ६ ॥ बहूतां परी राम संतोषवीला | पुढे सिंधु तो ही जळामाजि गेला । नळे वानरांची दळे सिद्ध केली । गिरी-शंग आणावया शीघ्र गेली ।। ७ ॥ त्वरें उत्तरे चालिले भार सैरा । बळी धांवती येकमेकां पुढारां ।। शिळा शीखरे झाड खंडे प्रचंडे | बळाचे कपी चालवीती उदंडें ॥८॥ कपी धांवती लक्ष कोटयानुकोटी । बळे गर्जती थोर आनंद पोटीं ।। गिरी कंदरे देश लंघूनि जाती । शिळा शीखरें शीघ्र घेऊनि येती ॥ ९॥ निळे पीवळे श्वेत आरक्त काळे । फिके जांभळे गौर जांभे गव्हाळे ।। बहू रंग पाषाण नाना परीचे । उभे वक्र वर्तुळ गाभे गिरीचे ॥ १० ॥ कपीवीर ते कशीघ्र घेऊनि जाती । बळे मघवाचे परी वर्षताती ।। शिळी सेतु बांधी नळू लागवेगें । असंभाव्य ती चालिली शैलशगें ॥ ११॥ कपी मोडिती वाड झाडे कडाडां। कडे पाडिती पर्वतांचे खडाडा ।। उड्या घेति आकाश पंथे धडांडा । बळें टाकिती सिंघु मध्ये थडाडां ॥ १२ ॥ विशाळा जडा वर्तुळा त्या उदंडी । बहू मस्तकी बाहती चंड धोंडी ॥ शिळा शीखरें फोडिती ते अभंगे। नभी भार झेपावती लागवेगें ॥ १३ ॥ कपी मारुती सारिखे जे उडाले । गिरी मंदरा सारिखे चालवीले॥ कपी साक्षपी देव-रूपी बळाचे । कडे लागले १ ते सवेळाचळाचे ॥ १४ ॥ 1 आयकेना (पा० भे०). ८२ कृतांतु यम. m. चळू ( पा० मे.). ८३ चवों पडूं. ८४ पालाण=पल्याण-खोगोर पूल. n. आनंदला (पा० भे).. गा ते (पा. मे० ). p. सर्व ( पा० भे०) ८५ मधवा-इंद. q. त्या (पा० भे०),