पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड (१५) शिळा-शीखरे झेलिती वृक्षपाणी । सदा सर्वदां गर्जती घोर वाणी ।। ८६ ।। तयामाजि ते मानवी वेषधारी । रुपें रम्य लावण्य कीमावतारी ।। असंख्यात मेळा रिसांवानरांचा । कपिश्रेष्ठ सुग्रीव राजा तयांचा ।। ८७ ।। प्रभू सांगतो सिद्ध आतां असावे । पुरीमाजि दुश्चीत कांहीं नसावे || तये सांगतां थोर उद्वेग जीवा । म्हणे मागुता कोण रे पाठवावा ।। ८८ ॥ पढे शक बोलाविला आदरेशी । म्हणे जाय रे बोल त्या सनिवासी ॥ म्हणावे कपी तूं सखा आमुचा रे । अनुचीत हे वावगे कासया रे ॥ ८९ ।। बहूतां परी शक तो शीकवीला । अळंकार देऊनियां तोषवीला ॥ नमस्कार केला. तयें रावणासी । निघाला बळे हेर तैसा त्वरेशी ।। ९० ॥ नभोमंडळी शीघ्र उड्डाण केले । देहे आपुले सर्व ही पालटीले ॥ रुपें सुंदरू जाहला शुद्ध पक्षी । निराळा नभामाजि तो सैन्य लक्षी ॥ ११ ॥ म्हणे सुनिवा ऐक रे येक भावे । कपी व्यर्थ आलासि मागे फिरावें ॥ त्वरें आपुल्या भूवना माजि जावे । समारंगणी वाउगे कां मरावें ।। ९२ ॥ त्रिकूटाचळा रामकांतेसि नेले । कपी सांगपां रे तुझे काय गेले ॥ तया मानवा साह्य जालासि कैसा । मनी नेणतां चालिला मूर्व जैसा ॥ ९३ ॥ बळे हीन झुंजासि त्याच्या न जावे । कदा कृपणाचे वहाडी न व्हावें ।।। महा मर्ख रे सख्य याचे नसावें । स्वये हीत तें ज्ञान पोटी वसावें ॥ १४ ॥ त्रिकूटाचळू लभ्य नाही सुरेशा । नरां वानरां प्राप्त होईल कैसा ।।। कपी-पुंगवा व्यर्थ आलासि वायां । समारंगणी बाण-घातें मराया ।। ९५ ॥ समस्ती रणामाजि जी मरावें । तये मैत्रिकेचे जनी काय घ्यावें !! बहूतां परी हे चि आतां करावें । तुवां आपुल्या भूवनामाजि जावें ।। ९६ ॥ शुके निंदिले सर्व ही वानरांते । बहूसाल धिःकारिलें हो तयांतें ।। तिहीं पाडिला ताडिला कुस्त केला | k पुन्हा सोडिला तो नभामाजि गेला ।। ९७॥ म्हणे शूक ऐका रिसे वानरें हो । तुम्हा रावणे रक्षिले निर्बळे हो । अरे मर्व हो व्यर्थ आलात येथे । समारंगणी जावया मृत्युपंथे ।। ९८ ॥ अरे सुनिवा वानरा भूललाशी । रिसांमर्कटांमाजि तूं मूर्ख होशी। मढा व्यर्थ घेऊनि आलासि सेना | तुला रावणू कोण कैसा कळेना ।। ९९ ॥ पन्हा बोलता जाहला घोर वाणी । कपी मागुते क्षोभले वृक्षपाणी ।। धरूनी बळे आणिले पक्षियाला । तिहीं रक्षिले पाशबंधी तयाला ॥१०॥ पुढे शीघ्र कोपेल हा रामचंदू । म्हणे दास भेटेल भावे समुद्र ।। प्रता- बळे तारिती चंड शीळा । बळे सेतु बांधूनि घेती सुवेळा ॥ १०१॥ ७९ हाती झाडे आहेत ज्यांच्या. ८० काम=मदन. ८१ पुंगव श्रेष्ठ, k. पुढें (पा० मे.).