पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४) श्रीरामदासकृत कृपा-सागरे ठेविला हस्त मायां । चिरंजीव लंकापती होय आतां ।।। मधूरे गिरे राघवें ऊठवीला | पुढे तिष्ठतू हात जोडोनि ठेला ।। ७२ ॥ बहू स्तूति केली रघुनायकाची । करी आदिनारायणाची विरिंची ॥ तयाचे परी शब्द कारुण्य बोले । पुढें पाउले लक्षितां अश्रु आले ।। ७३ ।। म्हणे राम बीभीषणा बैस आतां । पुरे स्तूति सांडी तुझी सर्व चिंता ।। सुमित्रीसुतालागि संकेत केला । दिजे मंगळ-स्नान बीभीषणाला ।। ७४ ॥ त्वरे ऊठला बंधु त्या राघवाचा । घटू आणिला पूर्ण h सिंधूदकाचा ।। पुढे शीघ्र बीभीषणालागि शेष। विशेषे दिले सौख्य राज्याभिषेके ।। ७५ ॥ म्हणे राम बीभीषणा सत्य वाचा । प्रतापे वधू जालिया वैरियाचा ।। तुला दधिले राज्य लंकापुरोचें । चळेना चिरंजीव जैसे ध्रुवाचे ।। ७६ ॥ वरू दीधला रामचंद्रे दयाळे । कृपा-सागरे दासपाळे नपाळे ।। प्रसंगी तये थोर आनंद जाला। दिल्हें अक्षयी राज्य बीभीषणाला ।। ७७ ।। कपी सग्रिवादीक मादी मिळाली । समस्ती विरी आदरे स्तूति केली ।। जगी धन्य हे भाग्य बीभीषणाचें । प्रितीपात्र जाला रघूनायकाचे ।। ७८ ।। रघूनायका देखतां सूख जाले । बहू दुःख मागील सर्वे निमाले । जगी धन्य गा धन्य बीभीषणा तूं | तुला जाहला प्रसन्न श्रीअनंतू ।। ७९ ॥ समस्तांसि सन्मानिले आदरेशी | नमस्कार केला रघूनायकासी ।। पुढें मंत्रियांमाजि तो बैसवीला । तेणे थोर आनंद बीभीषणाला ।। ८० ।। म्हणे राम बीभीषणा बैस आप्ता । त्रिकूटाचळ सांग साकल्य वार्ता ।। वदे राज्य लंकापुरी सर्व सेना । मनामाजि i संतोषला रामराणा ।। ८१ ॥ पुढे राम बीभीषणा मंत्र पूसे । कपी-भार पैलीकडे जाति कैसे ॥ विचारूनियां सुनिवाचे j निमित्तें । म्हणे हो क्षमा मागिजे मार्ग याते ।। ८२ ।। समुद्रासि देऊनियां श्रेष्ठ मानू । करावा अती आदरे सुप्रसन्नू ।। मनी बोलणे सत्य मानूनि देवें । समुद्रातिरी बैसिजे शुद्ध भावे ।। ८३ ।। त्रिकूटाचळाहून तो हेर आला । पुढे सर्व पाहूनि शार्दूळ गेला ।। समाचार सांगे तया रावणाला । म्हणे वानरेंशी बळें राम आला ॥ ८४ ॥ समाचार हा सत्य हो जी भुपाळा । नव्हे मिथ्य हे देखिले म्यां चि डोळां ।। मिळाले कपी रीस कोट्यानुकोटी । समुद्रातिरी जाहली थोर दाटी ।। ८५ ।। बळे राहिली ते असंभाव्य सेना । विरांची असंख्यात संख्या असेना ।। ७३ विरिंची ब्रह्मदेव. ७१ सुमित्रा लक्ष्मणाची आई. h. शुद्धोदकाचा (पा० भे०). ७५ शेष शेषाचा अवतार लक्ष्मण, ७६ ध्रुव-उत्तानपाद राजाचा मलगा. ७७ मादी-ज- माव. i. संतापला (पा० भे०). ७८ मंत्र-मसलत. j. नि मलें (पा० भे).