पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (१३) तया देखतां काळ भीडूं शकेना | तुम्ही मश्यके राक्षसे सर्व सेना ॥ ५७ ॥ रणी तीव्र त्या राघवाचेनि बाणीं । तुटो लागले तूमचे पादपाणी ।। घडे मस्तके मेदैमांसें चिडाणी । न होतां सिता भेटवा चौपपाणी ।। ५८ ॥ तया बोलतां ते सभा तप्त जाली । सुता मंत्रियांचे मुखीं तीन बोली ।। असंभाव्य तो रावणा कोप आला । कुशब्द बहू त्रास बीभीषणाला ।। ५९ ।। सभेमाजि धिक्कारिले रावणाने । उठोनी पदे ताडिले दुर्जनाने । बहतां मधे येकला धर्ममूर्ती । मनी खोचला तो उदासीन चित्तीं ।। ६० ॥ मन भंगला हो तया धार्मिकाचा । पुढे त्याग तात्काळ केला सभेचा ।। उडाला नभोमंडळामानि वेगी । पुरोहीत चत्वारि ते पृष्टभागीं ॥ ६१ ॥ झळंबे मनी लोभ त्या सांडि केली । अकस्मात ते वृत्ति भंगूनि गेली।। पुढे वाक्य बोलोनियां रावणाते । उदासीन तो चालिला व्योम पय ।। ६२ ॥ पुरोहीत चत्वारि ते पृष्ठभागी । खरे उत्तरे चालिले लागवेगीं ॥ समद्रासि लंघूनि पैलाड गेले । नभी पारखे सुनिवें ओळखीले ॥ ६३ ॥ कपीद्र ह्मणे पैल पाहे विशाळ | नभी येतसे कोण हा पंच-मेळू ॥ अकस्मात खालावला व्योम-पंथें । भिडों पाहती वानरें त्या अनथें ।। ६४।। मिळाले कपी बोलती त्यासि वाचा । अकस्मात आलास तूं कोण कैंचा ।। ह्मणे बंधु मी होय लंकापतीचा । परी दास अंकीत या राघवाचा ।। ६५॥ पुरी त्यागिली सर्व येका जिवेशी । करा हो तुम्ही भेटि या राघवाची ।। ह्मणे सत्य बीभीषणू नाम माझे | नव्हे अन्यथा सर्वथा वाक्य दूजे ।। ६६ ।। कपी सर्व ही जुत्पती धर्म-मूर्ती । बहूतां परी ऐकिलो वाड कीर्ती ॥ समस्ती तुम्ही हीत माझे करावे । कपाळ-पणे राघवा भेटवावें ।। ६७ ।। ह्मणे वीर सुग्रीव नावेक बैसा । त्वरें मात हे जाणवीतो सुरेशा ॥ कपीराज तो लागवेगे निघाला । अती आदरे भेटला राघवाला ॥ ६८ ॥ समाचार साकल्य तो सांगताहे । ह्मणे भेटि नीशाचरू इच्छिताहे ।। परी अंतरी कोण कैसा कळेना । तया ठेवितां राजनीती मिळेना ॥ ६९ ॥ समस्ताकडे पाहिले राघवाने । बहूतांपरी बोलिले तें सभेने ॥ मनी पाहतां देखिला दैन्यवाणा | कृपाळूपणे आणवी रामराणा ॥ ७० ॥ उभे राहिले भाग्य बीभीषणाचें । करी अंतरी ध्यान पादांबुजाँचे ।। भिजे दिव्य सर्वांग त्या अश्रुबिंदीं । मिठी घातली राम पादौरविंदीं || ७१ ।। ६१मेद-चरबी. ६२ चाप-तीरकमटा. ६३ पाणी हात. ६४ मनू-मन. ६५ व्योम आका- श. ६६ पंथ वाट. ६७ पुरोहित उपाध्याय. ६८ नभ-आकाश. ६९ पारखे परके. g. पुरा (पा.मे.).७० नावेक-क्षणभर. ७१ अबुज-पाण्यांत उगवलेलें (कमळ), ७२ अरविंद-कमल.