पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) श्रीरामदासकृत सिते सुंदरी लागि संभोग द्यावा । समूळे बळे रामशत्रू वधावा ।। . न हे ईतुके सर्व ही कृत्य जालें । सुखे सर्वदां चित्त माझे निवाले ।। ४२ ॥ अहंकारला रावण कोटिगूणे | मनी मानिले सर्व ब्रह्मांड ऊणे ॥ समस्तांमध्ये आगळा मेघवर्ण । पुढे बोलता जाहला कुंभकर्ण ॥ ४३ ॥ वदे कुंभकर्णं तया रावणाला | मदें सर्व ही नातिधर्मू बुडाला ।। अकस्मात लंकापती बुद्धि नासे । पुढे सर्व ही सूख तेणे विनाशे ॥ ४४ ।। जगें निदिले तेंचि टाकून येतां । पुढे वेळ नाही तया दुःख होतां ॥ विर्षे घोळिले ठेवितां प्रीति तेथे । पुढे सत्वरा जाइजे मृत्युपंथें ॥ ४५ ॥ म्हणे कुंभकर्ण असे काय केले । सिता आणितां सर्व ही राज्य गेलें । पुढे भंगले चित्त जाणूनि जीवें | f मनासारिखें बोलिला तो स्वभावें ॥ ४६॥ शुभाशूभ जे मानले तूजलागीं । घडो ते चि आतां भले या प्रसंगी ॥ बळे माझिया सर्व सूखे रहावें । पुढे काय होईल तैसें पहावे ।। ४७ ॥ कपी मानवी सर्व कैसे मिळाले । क्षुधे कारणे माझिये प्राप्त जाले ॥ रिपू घालितों ऊदरामाजि सांठा । नरें वानरें घांस घेतो घटाटा ।। ४८ ॥ उदेल्या महा घोर माझेनि कोपें । पुढे देखतां तो चळी काळ कांपे । रिसे मर्कटें बापुडी दैन्य वाणीं । रिपू आमुचे थोर वाटे शिरीणी ॥ ४९ ॥ तया बोलतां रावणा सूख जाले । स्तुतीउत्तरे आदरें गौरवाले ॥ महावीर पारश्व ऊदीत वेगी | पुढे बोलता जाहला ते प्रसंगी ॥ ५० ॥ अहो कायसा मंत्र पूसा रिपूचा । जनी कोण लेखा तयां मर्कटांचा ।। समर्थापुढे दूसरा कोण कैचा । करूं येकला सर्व संहार त्यांचा ।। ५१ ॥ सितची बहू प्रार्थना का करावी । प्रभू सांगतो बुद्धि पोटी धरावी ॥ म्हणे वीर पारश्व त्या रावणाला | बळात्कार राया करावा सितेला ॥ ५२ ॥ म्हणे रावण धन्य गा बुद्धिवंता । तुझं बोलणे मानले दृढ चित्ता ॥ परी शाप आहे मला ब्रह्मयाचा । करींना बळात्कार हे सत्य वाचा ॥ ५३॥ तया बोलतां दुःख बीभीषणाला । बहूसाल संतापला क्रोध आला ॥ म्हणे रे रघूनाथ पूर्ण प्रतापी | दुरात्मे तुह्मी नष्ट चांडाळ पापी ॥ ५४ ॥ तुम्ही राक्षसे निर्बळे बुद्धि-हीने । मती मंदली पातकाचेनि गूणे ॥ सरां कारणे राम आला कळेना । मदें मातला रावण ओळखना ।। ५५ ।। कपी वीर ते दूरि टाकूनि शंका | मिळाले करायास निर्मळ लंका ॥ त्रिकुटाचळू दृझ्य नाही तयांला । तव जानकी भेटवा राघवाला ।। ५६ ॥ रुपे कर्कशे कोपला वीर गाढा । रणामंडळी राम वाईल मेढा ।। f. तया (पा. भे० ). ५८ शिराणी आवड, ५९ मंत्र-मसलत, ६० लेखा-हिशेब.