पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. वनें व्यापिली वानरें गर्जताती । दिशा लंघिली श्वापदें पक्षियाती ॥ भुते खेचरे थोर धाके पळाली । चळी कांपती दैन्यवाणी गळालीं ॥ २७ ॥ कपींची पुढे चालिली दाट थाटें । वनें चालतां सर्व होती सपाटे ।। महा थोर विंध्याचळा लागवेगें । पुढे चालिले सर्व सांडूनि मागें ॥ २८॥ तयां चालतांचालतां दक्षणेसी । बहसालआवेश माहा विरांसी ।। पुढे देखिले शंग मैळाचळाचे । तयामस्तकी भार गोळांगुळांचे ॥ २९ ॥ गिरी-शंग-पाठार पाहोनि वेगी । बळें चालिले भार ते दक्षणांगीं ।। पुढे चालता चालतां अस्तमाना । समुद्रातिरी लोटली भीम सेना ॥ ३० ॥ कपी-सैन्य सिंधतिरामाजि आलें । असंभाव्य देखोनि चक्कीत नाले । जळें मातला सिंधुलाटे धडाडी । करी गर्जना मेघ जैसा घडाडी ॥ ३१ ॥ दिसे पाहतां सर्व आकाश जैसे । कळेना सिमा दाटलें तोय तैसें ।। बहूपाण-जंजाळ देखोनि डोळां । भयासूर त्यां कंप सूटे चळाळां ॥ ३२ ॥ समुद्रातिरी राहिली चंड सेना । असंभाव्य तें सैन्य भूमी दिसेना ।। गिरी वृक्ष देखोनि येती फुराणें । बळे साधिती अंतराळी किरणे ॥ ३३ ॥ कपीभार ते सर्वही स्वस्थ जाले । महापर्वतांचे परी ते मिळाले ।। समुद्रातिरी राहिले सैन्य जैसें । पुढे वर्तले त्रीकुटा माजि कैसे ।। ३४ ॥ सिताशुद्धि घेऊनियां e रुद्र गेला । तयीं आखयातें क्षयो प्राप्त जाला ।। बहू मानसी दुःख मंदोदरीला | तिने शीत्र पाचारिले देवरौला ।। ३५ ॥ म्हणे देवरालागि वीभीषणा हो | तुम्हीं आजि वेगीं सभेमाजि जा हो । मदोन्मत्त तो अंकशे आंवरावा । विवेके बळे राव तैसा वळावा ।। ३६ ।। म्हणे धन्य हो धन्य तूं राजकांते । मनी माझिया हीत ऐसें चि होते ॥ बरी अंतरी मातघेऊनि पुर्ती । निघाला सभेमाजि तो धर्ममूर्ती ॥ ३७॥ तया रावणाच्या गृहामाजि गेला | बहूतांपरी रावणू शीकवीला ॥ पुढे दोघे ही ते सभेमाजि आले । महावीर राक्षेस सर्वे मिळाले ॥ ३८ ॥ सभे श्रेष्ठ तो रावणू कुंभकर्ण । सभेमाजि बीभीषणू अग्रगण्य ।। सभे सर्व ही पुत्र मंत्री मिळाले । तयांलागि तो रावणू काय बोले ॥ ३९ ॥ तया रावणे सर्व सांडूनि शुद्धी । पुढे प्रेरिता जाहला पाप-बुद्धी । म्हणे ऐक गा बुद्धिवंता प्रहस्ता । करी रे मला वश्य ते रामकांता ॥ ४० ॥ सिते कारण म्या बहू कष्ट केले । परी पाहतां सर्व ही व्यर्थ गेले ॥ मनी चितिले को. काही पुरेना । उरे शीण तो शोक पोटी धरेना ।। ४१ ।। ५४ किराणे उड्या. e. भीम (पा. भे०). ५५ देवर-दीर, नवन्याचा भाऊ५६ प्रहस्त- रावणाच्या एका प्रधानाचें नांव. ५७ कोड-इच्छा..