पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) श्रीरामदासकृत ह्मणे जानकी देखिली रामचंद्रा । क्षमारूप लंकेसि आहे नरेद्रा ॥ १२ ॥ सिता रावणे रक्षिली वाटिकेसी । प्रभू पाहिली म्यां स्वये निश्चयेशी ॥ तये घोर नीशाचरी रक्षणेसी । बळे ठेविल्या कर्कशा गर्वराशी ।। १३ ।। पढ़ें राघवे सुग्रिवाचे निमित्तें । विचारूनियां सर्व ही वानरांते ।। दळेशी बळे दक्षिणे चालि केली । विरांची असंभाव्य सेना मिळाली ॥ १४ ॥ कपी सुनिवे सर्व भूमंडळींचे । बहू आणिले वीर मेरू बळाचे ॥ विरा पाठिशी भार कोटयानुकोटी । रिसांवनिरांची असंभाव्य दाटी ।। १५ ।। अती आदरें स्कंधभागी विराने । रघुनायका घेतले मारुतीने ॥ सुमीत्रासुता लागि त्या अंगदानें । प्रभू चालिले ते बळी थोर मानें ॥ १६ ॥ सिता शोधिली भीमराजे विशाळे । दळे लोटिली वानरांची दिसाळे ।। गिरीतुल्य झेपावती वायुवेगे । करा पल्लवी झेलिती शैलशंगें ॥ १७ ॥ अपार करें वानरें सैर मेळा । कठोरें करें फोडिती चंड शीळा ।। रिसे कर्कशे भीस *भिंगोळवाणी । मध्ये सांवळा रामकोदंडपाणी ॥ १८ ॥ पढे चालतां भार गोलांगुळांचे | कडे लागले थोर विंध्याचळाचे ॥ तया पर्वता माजि चंडे उदंडे । विशाळे बहू लागली झोखंडे ॥ १९ ॥ कपी भार विंध्याचळा माजि आले | असंभाव्य ते झाडखंडी निघाले ॥ चरी वार्ड झाडे तळी दाट छाया । कपी सर्व ही सिद्ध जाले उडाया २० ॥ तळी पोटळे उंच शाखा फुलांचे | वरी लोंबती घोस नाना फळांचे ।। बहुतां परींच्या बहू पक्षियोती । बह श्वापदे ती फळे भक्षिताती ।। २१ तया माजि ते भार कोटयानुकोटी । रिसां वानरांची असंभाव्य दाटी ॥ झडा घालिती एकमेकां पुढारे । खडडां बळें वृक्षवल्ली विदारे २२ ।। कितीएक ते बैसले वृक्ष अनी । वरी वाइली वक्र पछे समनी ।। कितीएक मध्येच ते गुप्त जाले । कितीएक ते वृक्षdमाथां मिळाले ।। २३ ॥ स्वइच्छा फळे भक्षिती आदरेंशी । बहू बांटिती येक मेकां त्वरेशी ।। फळे तोडिती टाकिती ते अपारें । वनामाजि ते क्रीडती भूभुकारें ।। २४ ।। कितीएक हेलाविती वृक्ष आंगें । कितीएक ऊफाळती लागवेगें ।। कितीएक ते झोबती आंग व्यस्ते । कितीएक ते लोबती एक हस्ते ॥ २५ ॥ कितीयेक पोटाळिती वाड झाडे । किती मोडिती आंग भारे कडाडे ॥ बहू मांडिली झाडखंडी धुमाळी। कितीयेक झेपावती अंतराळी ।। २६ ॥ ४५क्षमारूप-सखरूप. ४६ वाटिका-वाडी, बाग. १७ निशाचरी-राक्षसी. ४८ रीस= भास्वल. * भिगोलवाणी-पांढरा. १९ गोलांगूल वानर. ५० खड-पंड जमाव. ५१ वाड- पुष्कळ. ५२ याती-जाती. ५३ वाइली घेतली. c. पाहिली (पा. भे). d. अओं (पा. भे०),