पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड.* नमू विघ्नहर्ता मुळी सैन्यभती ॥ मुढां धूर्तकर्ता विभांडी विवर्ता । चतुर्भूज मत्तीनन शोभताहे || तया चिंतितां भ्रांति कोठे न राहे ॥ १॥ सदा भेदहंती महंती महंतां । सदा ज्ञानवंती नियंती नियंता ।। सुविद्या-कळा-स्फूर्ति-रूपा है अमपा | नमस्कारिली शारदा मोक्षरूपा ॥ २ ॥ नये बोलतां चालतां रूप कांहीं ।। नये भावितां दावितां सर्वथा ही ॥ सदा संत आनंदरूपी भरावें । पदी लागतां सद्गुरूवे तरावे ॥ ३ ॥ नमस्कारिला राम कोदंडपाणी | पुढे गावया रामरामेति वाणी ॥ भविष्योत्तरे बोलिली ती पुराणीं । उमाकांत ध्यातो सदा शूळपाणी ॥ ४॥ कथा शंकराची कथा कार्तिकाची ॥ कया चंडिकेची कथा मोरयाची ॥ कया वेंकटाची कथा विठ्ठलाची । कथा मल्ल याची कथा भैरवाची ॥५॥ कथा नसिंहा बामना भार्गवाची | कथा कौरवा पांडवा माधवाची ॥ कथा देव इंद्रादिब्रह्मादिकांची । समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची ॥ ६ ॥ जेणे फेडिला पांग ब्रह्मादिकांचा । बळे तोडिला बंध त्या त्रीदशांचा ॥ ह्मणोनी कथा थोर या राघवाची । जनी ऐकतां शांति होते भवाची ॥ ७ ॥ कथा थोर रामायणी सार आहे । दुजी ऊपमा या कथेला न साहे ॥ तिन्ही लोक गाती सदां आवडीनें । भविष्योत्तरें वानिली शंकराने ॥ ८ ॥ ऋषी माजि श्रेष्ठू विचारे वरिष्ठ । सदा येकनिष्ठू सगूणीं प्रविष्ट । चरित्रे विचित्रे वनामाजि वस्तां । मखें बोलिला राम नस्तां समस्तां ॥ ९॥ कथा राघवाची सदाशीव पाहे । तळी ऐकतां शेष थकीत राहे ॥ कथा श्रेष्ठ हे ऐकतां दोष जाती । bमहासकृती ऐकती धन्य होती ॥ १० ॥ कथा संपली कांड संदर्य मागे । प्रवाहो पुढे चालिला लागवेगें ॥ खये श्रोतयांतें कवी प्रार्थिताहे | पुढे युद्धकांडी कथा रम्य आहे ।। ११ ॥ षीपर्वती रामसौमित्र होते । अकस्मात आला हनूमंत तेथे ॥

  • या कांडाच्या दोन प्रती आम्हांस मिळाल्या. एक रा• पुराणोक यांजकडून मिळाली

ती. दुसरी रा. बाळकृष्ण विठ्ठल पोतनीस यांणों कोल्हापूर प्रांतांतून आम्हांकरिता आणपिली ती. ही दुसरी वरेच ठिकाणी अशद्ध आहे, तथापि तिचा उपयोग बहुत हो- ईल. दोहींतील फरक पुढे दिला जाईल. १० मत्तानन गजवदन. a. अरूपा (पाठभेद). ११ शूळपाणी-शंकर. १२ कार्तिक-- त्तिकांचा पुत्र कार्तिकस्वामी. १३ त्रिदश-तीस, तीन दशक, देव. b. जनों (पा० भे०), ४१ ऋषीपर्वत ऋष्यमूक पर्वत.