पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) श्रीरामदासकृत सुंदरकांड. कपी लागवेगें मुखें बोलताहे । अशोकी जगन्मात कल्याण आहे ।। पुढे मारुती तो नमस्कार घाली । मनोवृत्ति* ते राघवाची निवाली ॥ ९९ ॥ समस्तांसि देखोनि आनंद जाला । सिताश्राद्ध घेऊनियां रुद्र आला ।। बहूतां बहू सांगती येकमेकां । सिता शोधितां सौख्य जाले अनेकां ।। १०० ।। सभामंडपी राम सन्मख पाहे । उभा दास साकल्य तो सांगताहे ।। महत्कृत्य व्हावे जनी येश यावें । प्रभूसी समस्तांसि कल्याण व्हावें ॥ १०१ ॥ सुंदरकांड समाप्त. - ३९ जगन्मात जगाची माता, सीता. * : चितवृत्ति' पा. 'होवो' असा मूळांत पाठ आहे.