पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड. बहूतां परीची बहू रम्य याने । बहसाल छत्रे विचित्रे निशाणे ॥ बहूतां परीच्या बहू साल शाळा । जळाल्या विवीधा विचित्रा विशाळा ॥ ८५ ॥ वळे लोक तेथे बळे पुच्छ घाली । बहूतां विरांची बहू शांति जाली ।। महा पुच्छ ते जाळ बंबाळ जाला । बहू साक्षपे वन्हि तो चेतवीला ।। ८६ ।। पळाले भैयासूर ते दरि थावे । कपी वीर लांगूळ घेऊनि धांवे ।। बहू भोवताहे बहू धांवताहे । उठे वन्हिचे चक्र लांगूळ पाहे ।। ८७ ।। फिरे गर्गराटें कपी चक्र जैसा । विधी शक अव्यग्र पाहे तमासा ।। विरां खेचरां भूचरां अंत झाला । त्रिकूटाचळा थोर कल्पांत आला ।। ८८ ॥ बहूसाल दारूमधे पुच्छ घाली । उसाळे नभामाजि दारू निघाली ॥ तडाडी थडाडी दडाडी धडाडी । शशी सूर्य नक्षत्रमाळा कडाडी ।। ८९॥ बह धूम्र तेणे कदां ही दिसेना | बहूसाळ वाणि । ते सोसवेना ॥ बहू घोष तो शब्द कानी पडेना । कपी रोषला झाडतां ही झडेना ।। ९० ॥ पुढे धूम्रत्यागी धगागीत आगी । महावन्हि कोपे चेि जाला विभागी ।। त्रिकूटाचळू कांचनाचा तखाकी । सतेजीक तेजें झकाकी लखाकी ।। ९१ ॥ महा वज लांगूळ कल्लोळ जाला । परी पाहतां रोम नाही जळाला ।। गदादीत. काया समुद्रांत घाली ।। निवाला कपी पुच्छज्वाळा विझाली ।। ९२ ।। समुद्री सुचिष्मंत होऊनि आला ।। नमस्कार घाली तये जानकीला ।। म्हणे जानकी येकला तूं विदेशी । कपी रे बहूतां परी कष्टलाशी ।। ९३ ॥ म्हणे मारुती धन्य हे दीस आले । तुम्हां देखतां सर्वही कष्ट गेले ॥ प्रभू वाट पाहील तो रामराजा । निरूपा चि मी शीघ्र जाईन काजा* ॥ ९४ ।। सिते मारुती योग वीयोग जाला । बहूसाल नेत्रोदकी पूर आला ॥ म्हणे | मारुती लोभ आतां असावा । सुरांचा बळें राम येतो कुडावा ||९५|| कपी मागुती मागुती वाट पाहे । उदासीन जातां गळी दाटताहे ।। विवेके जिवामाजि तो धीर केला । पुढें मारुती शीघ्र सिंधू उडाला ।। ९६ ।। कपीलाागें सांगे सिताशुद्धि जाली । सुखे ऐकतां मंडळी ते निवाली ।। समस्तां जणांलागि आनंद जाला । कपी मारुती राम भेटी निघाला ॥ ९७ ।। दळेशी बळे राहिला रामराजा । कपीसि ते वीर वष्टीत फौजा । स्फरदप ऊभारिला दिव्य बाहो । रघुनायके देखिला भीम देहो ॥ ९८॥ ३१ भयासूर-भयंकर. ३२ विधी वला. ३३ शक=इंद्र. वाणी घाण. ३४ रोम= केंस. ३५ शुचिष्मंत स्वच्छ, ३६ विदेश-परदेश. ३७ निरूपा सांगा, भाज्ञा द्या.

  • वोजा" पाठभेद. जननो' पाउभेद. ३८ 'मिवा' पाटभेद