पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत म्हणे जाई रे आणि वेगें कपीला । तया नाणितां शीघ ताडीन तूला ।। ७० ॥ विरंची पुढे घातला चालवीला । असंभाव्य तो लोकमेळा मिळाला ॥ वनामाजि येतां नमस्कार घाली । तया मारुतीची बहू स्तति केली ।। ७१ ॥ बहतांपरी कीर्तिचे येश ध्यावे | दयाळा कपी ये घडी शांत व्हावे ।। न होतां मला मारिती ब्राह्मणाला । बहूसाल कल्याण व्हावे तुम्हांला ।। ७२ ।। कपी वीर तो थोर को कडाडी । करी गर्जना मेघ जैसा गडाटी ।। परी सांकडीमानि कांहीं न चाले । मिळाले कपीलागि घेऊनि आले ॥ ७३ ।। अरे मर्कटा थोर अन्याय केला । म्हणे रावणू मारितों शीघ तूला ।।। तुझा मृत्यु कोठे खरे सांग आतां । मुढा कश्मळा मारितो जातजातां ।। ७४ ।। म्हणे मारुती काळ मारूं शकेना । कृपाळूपणे तोषला रामराणा ।। न वाटे खरे सांगतां रावणाला । म्हणे वानरूलांगुळी आग्नि घाला ।। ७५ ॥ म्हणे रावणू पाहतां काय आतां । चिरे आणवा सांगताहे समस्तां ॥ असंभाव्य ते वीर धांबोनि गेले । त्रिकुटाचळी लोक ते नग्न केले ।। ७६ ।। पुढे पुच्छ ओढोनि गुंडाळिताती । सिमा सांडली वीर गुंडाळितासी* ।। तया वेढितां ते असंभाव्य लांबे । विरवीर त्या लांगुळालागिं झोंबे ।। ७७ ॥ कितीएक ती आणिली ऑज्य तेले । कितीएक ती मोगरेले फुलेले ।। महापुच्छ ते सर्व ही भीजविलें । पहा हो कपी बापुडे व्यर्थ मेलें ॥ ७८ ॥ तया लावितां वन्हि तेथें न लागे । बळें फुकितां तो विरे वीरु भागे ।। तया देखतां रावणू शीघ्र आला । बळे फुकितां फुकितां तो गळाला ।। ७९ ।। पुढे रावणू थोर को कडाडी । बळे फुकितां जाळ नेटे धडाडी ।। जळाली मुखें भस्मल्या खांड मीशा | बहू साल लंबीत होत्या विशेषा ।। ८० ।। बळें चेतला वन्हि नेटें तडाडी । कडाडीत ज्वाला दडाडी धडाडी ॥ कपी वीर तो वाँड जाला उडाला । पुढे जाळिता जाहला त्रीकुटाला ।। ८१ ॥ गृहां गोपुरांमाजि ते पुच्छ घाली । त्रिकूटाचळी आगि नेटे निघाली ॥ बिदी हाट बाजार चौबार कुंचे । बळे बोबली नागवा लोक नाचे ।। ८२ ॥ बहतां परीची बह हांक जाली । पळारे पळारे पळा आगि आली || गरे वांसरे शिंगरें लेकरें तो । ॐनी माजरे तैं खरें येसरे ती ॥ ८३ ॥ किती शेरडे मेंढरे ती अचाटे । पळाली। किती राक्षसे वल्कलाटें ।। किती शाकटें कुंजरें दिव्य घोडे । मही मंडळी त्यासि नाहीत नोडे ।। ८४ ॥ २४ विरंची ब्रह्मा. २५ सांकडी-संकट. २६ कश्मल पापी. * " वेटाळिताती" पा० भे०. २७ आज्य=(शेळीचे) तूप, (अजा=शेळी). २८ वाड-पुष्कळ किंवा मोठा. २९ शुनी कुत्रों, ३० खर-गाढव. +" जळाली" पाठ भेद. कल्कला2' तर नव्हे !