पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड नव्हाटे जुनाट वने दाट थाटें । वने मोडिता जाहला कडकडाट ॥ ५५ ॥ फळे भक्षिली सर्व नाना परीची । बहू स्वाद वर्ण कळाकूसरीची ॥ कपी वीर तो तृप्त जाला निवाला । पुढे वृक्ष मोडावया सिद्ध जाला ॥ ५६ ॥ तरू मोडिले पाडिले ऊपटीले । किती झोडिले झाडिले चूर केले ॥ गिरी सारिखे ढीग सांडूनि टाकी । तयाला असंभाव्य राक्षेस हांकी ॥ ५७ ॥ वने मोडितां मोडितां हांक नाली । कितीएक ते दैत्यमांदी मिळाली ॥ गलोला कमाना करी भिंडमाळा | बळे हांकितां नाद गेला भुगोळा ॥ ५८॥ बहूता बळाचे बहू लोक आले । कितीएक ते धिंग मोठे मिळाले । वने वेढिली धांवले काळ जैसे । भुतां खेचरां थोर कल्पांत भासे ॥ ५९॥ कपी वीर चौताळला वेग केला । कितीएक राक्षेस भंगोनि गेला || त्रिकूटाचळी रावणा जाणवीले । वनी वानरे थोर अद्भूत केले ।। ६० ।। बळें धांविला कूमरू रावणाचा । सदां अक्षयी वीर मोठ्या बळाचा ॥ असंभाव्य राक्षेस धांवोनि आले | कपीलागि मारावया सिद्ध जाले ।। ६१ ॥ बळे आगळा आखया लेक्ष भेदी। चकावी कपी वीर लागो च नेदी।। बहू भागले मारितां भग्न जाले । कितीएक ते दैत्य पोटीं गळाले ।। ६२ ।। पहा हो कपी धीट मोठा पळेना । सदा सर्वदां लक्ष याचे चळेना ।। पुन्हा मागते वीर ते सिद्ध जाले । कितीएक ते पाश घेऊनि आले ॥ ६३ ॥ मुखे बोलती मर्कटा बैसलेसी । समारंगणामाजि युद्धा न येसी । कपी वीर तो गर्जला भूभुकारें । समारंगणीं चालिला घोर मारे ।। ६४ ॥ रिप झोडिले पाडिले वृक्षघाते । भभी लोळती दैत्य होऊनि प्रेते ॥ पुढे देखिले जंबुमाळ्या कुटीला | बळे आखया आपटीला पिटीला ।। ६५ ।। पळाले फळी फूटली राक्षसांची । पुढे हाक गेली तया आखयाची ॥ त्रिकूटाचळीं शोकआरंभ जाला । प्रितीचा बहू थारखया तो निमाला ॥ ६६ ॥ पुरीमाजि अंतःपुरी घोष जाले । सुखानंद मंदोनि गेले विझाले ॥ बह दुःख जाले च मंदोदरीला । तिने कूमरालागि आकांत केला ॥ ६७ ॥ पुसे रावणू काय रे काय झालें । तुम्हालागि मारावया कोण आले ।। कपी येकला बैसला तो पळेना । चळेना ढळेना कदा आकळेना ।। ६८ ॥ तया टाकितां पाश मोठा चि होतो । लघुरूप होऊनि नीघूनि जातो ।। कदां ही पडेना कदां सांपडेना । तेणें मारिली दैत्य ऊदंड सेना ।। ६९ ॥ विधीलागि बोलाविले राबणाने । कठीणोत्तरी गांजिले दुर्जनाने ।। १८ मांदी-समुदाय. १९ गलोल गोफण. २० कमानधनुष्य, २१ खेचर पक्षी. ३२ लक्ष निशाण. २३ निमाला मेला.