पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) श्रीरामदासकृत असंभाव्य त्या दीवट्या दीपथावे । बळे लागवेगें समदाय धावे ॥ ४०॥ पुन्हा मागुती दीप घेऊनि आले | बळें धांवतां पुच्छमारे विझाले ॥ तया लांगळे रंघिली सर्व दोरे । कपी वीर तो वावरे अंधकारे ।। ४१ ॥ सभामंडपी गुगुल्या तो करीतो । मुखे नासिकें कर्ण छेदून नेतो ।। बळे गाल सर्वांग ही बर्बडीतो । चिरें *फाडितो ओढितो गुर्गुरीतो ॥ १२ ॥ बळाचे महावीर तेथे मिळाले | परी अंधकारें चि कांहीं न चाले ।। किती लोटिले कूटिले चूर केले । भयाभीत कोणास कोणी न बोले || ४३ ।। कपी वीर तो थोर लाहान होतो । धरीतां बळे हात मोडोनि जातो ।। बुक्या मारितो पांपरा वजथापा । असंभाव्य तो कोपला राव कोपा ।। ४४ ।। म्हणे वीर हो काय रे काय झाले । कळेना मुखे बोलती काय आलें ॥ भयासूर ते गुर्गुरीते कळेना । करूं काय आम्हांसि ते +आकळेना ।। १५ ।। कपी वीर रायाकडे शीघ्र गेला | बळे थाप मारून मूगूट नेला ॥ बरे ठोसरे मारिले रावणाला । म्हणे मारितो रे. तुझ्या आखयाला ।। ४६ ॥ चिरें सुंदर फाडिली रावणाची । करी भूषणे चूर मुक्ताफळांची ।। कपीने सभा सर्व ही नग्न केली । त्रिकुटाचळी ख्याति ऊदंड जाली ।। ४७ ।। हाहाकार जाला सभेमाजि मोठा । बळें मारुती मारिताहे चपेटा । सभामंडपी फार आकांत झाला । कपीने पुढे मोकळा मार्ग केला ॥ ४८ ॥ लपाला कपी पच्छ ओढानि नेलें । लघ मश्यकाचे परी रूप केलें ॥ असंभाव्य त्या दीवटया चंद्रज्योती । असंख्यात राक्षेस धावूनि येती ।। ४९ ॥ सभामंडपामाजि धांवोनि आले । तेणें नागवे लोक लज्जीत जाले ।। महावीर मागे पुढे हात देती । कपीने बहूसाळ केली फजीती ॥ ५० ॥ सभामंडपी वस्त्र कोठे दिसेना । भुतासारिखे नागवे लोक नाना ।। चिरे आणिली नेसले स्वस्थ झाले । मनामानि लज्जीत कोणी न बोले ॥ ५१ ।। कपीवीर तेथूनि वेगें उडाला । अशोकावनामाजि वृक्षी दडाला ।। अधोमूख तो जानकीलागि पाहे । कपी राममुद्रा पुढे टाकिताहे ।। ५२ ।। सितेने पुढे मुद्रिका ओळखीली । बहूतां परी शब्द कारुण्य बोली ।। पुढे मारुती भेटला जानकीला । समाचार सांगोनि आनंद केला ।। ५३ ।। क्षुधाक्रांत मी जाहलों फार माते । तन चालतां चांचरी सर्व जाते ।। बहूतांपरी बोलिला जानकीला । समाचार सांगानि आनंद केला ।। ५४ ।। अशोकी बहू लागले वृक्षनाना । पाहतां असंख्यात संख्या असेना ।। १६ चिरें वस्त्रे. * "फेडितो" पाठभेद. + " आवरेना" पाठभेद. १७ आखयाज रावणपत्र " अक्ष". "निरोपचि आज्ञेप्रमाणे निघाला" पारभेद,