पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड. गुरे शौकटें राक्षसालागि पाडी । पदी पुच्छ बांधोनि पाडी पछाडी ।। २५ ॥ पडो लागले दैत्य नेटें बदांदा । कितीएक ते दीर्घदेही भदादां ।।। बळाची दळे पाडिलीं पुच्छमारें | दिसेना परी गर्जतो भूभुकारे ।। २६ ॥ धरी पंथ कोण्हास ही जाउं देना । पुरीमाजि पाणी कदां येउं देना ।। चुली पेटल्या वन्हि तेथें विदारी | बळी धांवती त्यांसि तेथेच मारी ॥ २७॥ गळे पाय बांधी किती हात बांधे । पुरीमाजि हांकेस ते हांक सांदे ॥ महावीर चौताळले ते धरेना । बळे वावरे पुच्छ ते आवरेना ।। २८ ॥ जना ओढितां पाडितां आपटीतां । समस्ता जना लागि पाडूनि जातां ।। पशूराक्षसी सर्व ही हाक केली । कितीएक ती चोर्डचिर्डोनि मेली ।। २९ ।। कितीएक ती राक्षसे हाकलीती । कितीएक ती राक्षसे बोबलीती ।। कितीएक ती थोर नाली रुदंती | कितीएक ती राक्षसे चर्फडीतीं ।। ३० ।। असंभाव्य + ते पुच्छ झाडी उलंडी । कडाफोडि होतां चि येतां चि झोडी ।। पुरीमाजि सर्वांस ही आट केला । विरें वीर राक्षेस सर्वे बुडाला ॥ ३१ ॥ नसे अन्नपाणी मुखामाजी घाणी । कितीएक ते जाहले दैन्यवाणी ।। पुरीमानि नानापरि घोळ केला । पुढे अस्तमानासि तो दीन गेला ।। ३२ ।। उदासे घरे मंदिरे थोरथोरे । महापुच्छ ते वावरे अंधकारे । भुजंगापरी सर्व वेटाळिताहे । विरें वीर चाकाटला सर्व पाहे ।। ३३ ।। मुलां लेकुरां माजि तें खेळताहे । निजेल्यांमधे पुच्छ ते लोळताहे ।। कुमारी कुमारा गळां हार घाली । भयाभीत अंतःपुरी हांक जाली ।। ३४ ॥ त्रिकूटाचळी सर्व ऊदंड आले । भयाभीत ते सर्व ही लोक जाले । कळेना बरे सर्पकी काय आहे । करी ते महामार त्याचा न साहे ।। ३५ ॥ अकस्मात ते काय होते कळेना । कळेना वळेना कदां आकळेना ।। सभेमाजि रायापुढे हाक गेली । अहो पाहतां काय लंका बुडाली ।। ३६ ॥ उगा लोळसा घोळ मोठा करीतो । करारूनि बांधोनि सर्वी धरीतो ।। बहूतां परी सांगती रावणाला । बहूतांजणांचा घरी कोड झाला ।। ३७ ।। नव्हे जी नव्हे सर्व सामान्य मातू । महाघोर हा थोरला पुच्छकेत् ।। सभामंडपी कोप रायासि आला । म्हणे सांगती त्यांस मारून घाला ।। ३८॥ तया मारितां पुच्छ तेथें चि आले । सभामंडपामाजि नेटे निघालें । दिवे पाडिले दीवटे आपटीले । अकस्मात हीलाल हीरोनि नेले ।। ३९ ।।। मुखें बोलती दीप रे दीप आणा । दिवे आणितां मूकती दैत्य प्राणां ।। ११ शाकरें-गाड्या, छकडे. * “ नेतां" असाही पाठ आहे. असंख्यात"असा- ही पार आहे. S" सोडी" पाठभेद, "घात" पाठभेद. १५ केतु-धूमकेतु, उत्पात.