पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत गुढ्या गोपुरे देउळे ती अपारे । हंडे कोठ जाळांधरे थोरथोरे ।। सुवर्णाचळामाजि तें तेज फांकेतिया पाहतां कीरणी दृष्टि झांके ।। ११ ॥ कपाटे लो हो अर्गळा पंथ मोठे | बळी बैसले थोर आश्चर्य वाटे ।। बहूसाल वाद्ये दडाडां धडाडां । खसी हाल आवाज होती भडाडां ॥ १२ ॥ पुढे पाहतां जावया रीग नाहीं । न सचे मनी मानसीं यत्न कांहीं ॥ पुढे भाम तो अंतराळे उडाला । लघरूप लंकेत होऊनि गेला ॥ १३ ॥ गृहां गापुरांचा बह दाट खेटा । सदा सर्वदां वाहती सर्व वाटा ।। बिदा हीट बाजार कंचे दकाने । सदां मस्त ते हस्ति जाती गुमाने ।। १४ ॥ सिलेभार सज्जीत ते राउतांचे । बरे फार संगीत होती बिरांचे ॥ दिसेना तयालागि झंजार कोणी । बळें जिंकिले पीडिले लोक तीन्ही ।। १५ ॥ बहू सज्ज ते राज्य लंकापुरीचे । परीमाज ते सैन्य मोठ्या बळाचे ॥ उफाळे चि जाती भुजा फर्फरीती । तयां देखतां देव ते थर्थरीती ॥ १६ ॥ त्रिकटाचळीं* ख्याति केली भिमाने । लघुरूप तो हिडताह घिरा ॥ गृहे गोपुरे पाहिल्या धर्मशाळा । अकस्मात त्या देखिल्या बंदिशाळा ॥ १७ ॥ हिनासारिखे देव ते दीन झाले । नसे शक्ति ना युक्ति पोटी गळाले ।। भयाभीत ते कांपती दीनवाणे । बह गांजिले दुःख ते कोण जाणे ॥ १८॥ सुरांकारणे कोप भीमासि आला । मनामाज आवेश तो थर्थरीला ॥ रुपे भर्भरीला तमें गर्गरीला । प्रसंगी तये मारुती गुप्त जाला ॥ १९॥ मनामाजि आवांकिले सर्व कांहीं । सिमा सांडिली तळणा त्यासि नाहीं ।। बहू मातले गर्व मोठ्या बळाचा । तयां झोडितो दास मी राघवाचा ॥ २० ॥ त्रिकूटाचळी ख्याति केली भिमाने । पढे पत्रिका धाडिली ब्रह्मयाने ॥ तिये वाचितां वाचितां राम हांसे । क्रिडाकौतुके अंतरामाजि तोषे ॥ २१ ॥ नटे नाटकू त्रीकुटामाजि कैसा । महा कांड सुंदर्य जाला तमासा ॥ देहे आपुले सर्व ही गप्त केलें । प्रसंगी तये पच्छ ते वाढवीले ।। २२ ।। बहू व्यापिली वाढली सर्व लका । कितेका मनी वाटली थोर शंका ।। गृहातान अतगृहा पुच्छ घाली । बह पाडितां फोडितां हांक जाली ।। २३ ॥ बळे लांगुळे रुधिल्या सर्व वाटा । वह तुंबला लोक तो दाट खेटा ॥ तयाभोवते पुच्छ बांधोनि भारे । नभी पोकळीमाजि नेटें उभारे ॥ २४ ॥ बहू भार ते स्वार मध्ये चि खंडी । महामस्त ते हस्ति ने उलंडी ॥ हुडेबुरूज. १० अर्गला अडसर, खिळी विदी-रस्ते, गल्लुया. १२ हाट बाजार

  • त्रिकुटाचळा मारुती सर्व पाहे । लघरूप होवोनियां हिंडताहे ' पाठभेद. 'तया' असा

मूळांत पाठ आहे. १३ लांगुळे शेपटें.