पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री॥ रामदासस्वामीकृत, सुंदरकांड.* नमूं सर्वकर्त्ता चि तो विश्वभर्ता । गुणी शोकहर्ता चि हा विवर्ता ।। परेहूँनि पर्ता चि पर्ती विव" । भुते भूतधर्ता चि धर्ता उधत ॥ १ ॥ महीमंडळींचे कपी रीसैराजे । तयांमध्यभागी महावीर साजे ॥ महारुद्र आक्षेप्रमाणे निघाला | सिताशाद्ध आणावया सिद्ध नाला ॥२॥ सवें मंडळी चालिल्या वानरांच्या । नभोमंडळामाजि फौजा विरांच्या ।। गिरीकंदरे देश नाना परीचे । तटाके नद्या ओघ जाती नदीचे ॥ ३ ॥ पुरे पट्टणे अट्टणे धुंडिताती | कपी वीर दाही दिशा हिंडताती ॥ सिता शोधितां शुद्धि कोठे न लागे । बळे धुंडितां ते विरे वीरु भागे ॥ ४॥ वनें भूवने रम्य नाना परीची । बरी शोधिली ती गिरीकंदरींची ॥ दरे शंग पाठार मैदान दारी । कपाटे गव्या वीवरें तो भुयेरी ॥ ५॥ कपी शोधितां शोधितां सुस्त जाले । नव्हे कार्य तें दैन्यवाणे मिळाले ।। समुद्रातिरी ते उदासीन जाती । गळाल्या तन थोर उद्वेग चित्ती ।। ६ ॥ कपी बोलती काय आतां करावें । न लागे सिताशुद्धि तेव्हां मरावे ॥ म्हणे मारुती वीर हो स्थीर बैसा । तिन्ही लोक पाहून येतो तमासा ।। ७ ॥ भयासूर तो भीम सिंधू उडाला । त्रिकूटाचळाहून पैलाड गेला ।। पुढे सर्व ही पाणजंजाळ पाहे । हनमंत विस्मीत होऊनि राहे ॥ ८॥ समुद्रा मधे भेटला तो अतीतू । म्हणे रे अरे रे अरे कोण रे तूं ।। हनुमंत घाली नमस्कार त्याला । मनामाजि तो थोर संतुष्ट जाला ।। ९ ॥ मुनी तो त्रिकूटाचळी शुद्धि सांगे । किराणे उडे तो कपी वीर मागे॥ अकल्पीत लंकापुरी कांचनाची । पुढें देखिली सौख्यदाती मनाची ॥ १० ॥

  • या कांडाच्या दोन प्रती आमांस मिळाल्या. एक रा. कृष्णाजीपंत कालगांवकर,

मु० सातारा, यांजकडून व दुसरी रा. एकनाथ महादेव पुराणीक मु. पुणे, यांजकडून. 'दोन्ही बऱ्याच शुद्ध आहेत. दोहोंत फरक दिसेल तो पुढे देऊ. या कांडांत मारुती लंकेंत जाऊन, सीतेचा शोध लावून, नंतर लंकेची होळी करून परत रामाला सीताशुद्धि सांगण्यास येईपर्यंत कथा आहे. विवर्त भोवरा. २ परावाणीची एक जाती. (परा, पश्यंती, मध्यमा, व वैखरी या चोहांतन पहिली). ३ रीस=आस्वल (कक्ष). १ सिताशुद्धि सीता कोठे आहे ह्या विषयी तपास. ५ पाठार-पर्वताच्या माथ्यावरचें मैदान ज्याला इंग्रजीत Platean अथवा Table-land ह्मणतात तो. ६ दारी 'दरी' करितां? ७ उद्वेग-दुःख. ८ किराणे उड्डाणे.