पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४) केली आहेत ती वाल्मिकीमुनीच्या आधारे लिहिली आहेत असा उल्लेख आलेला लक्ष्यपूर्वक वाचणाराच्या ध्यानी असेलच. उदाहरणार्थ युद्धकांडाचा प्रसंग ६ श्लोक १०६ व किष्किधा कांडाचा पांचवा श्लोक पहा. ह्या खेरीज ज्या रामदासी ग्रंथांची नावे आम्हांस कळली आहेत व जे अद्याप छापले नाहीत त्यांची नावे एथे देतो म्हणजे शोधकांस शोध करण्यास बरे पडेल:-- १ अंतर्भाव (ओवीबद्ध ) आत्माराम (कित्ता) ३ एकवीस समासी ( कित्ता) ४ गोसावी. ( कित्ता) ५ जुनाट पुरुष. (कित्ता). ६ पंचसमासी. ७ सगुण- ध्यान. ८ सप्तसमासी. महिपतीसारखे भाविक चरित्रकार चरित्रनायकांच्या कालाचा फारसा निर्देश करीत नाहीत तरी प्रसंगविशेषों तेही ती माहिती देतात असे पुढी. ल लेखावरून दिसतेः-- शके सोळाशे तीन निश्चिती । संवत्सरासी नाम दुर्मति ।। समर्थ तनू त्यागूनि प्रीति । समरस होती श्रीरामी ।। ९५ ॥ माघवद्य नवमीस | निर्गुण झाले रामदास ।। ११४ ।। तान संतविजय-अध्याय २५वा.