पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकोड. (१०३) रघूनायके घोर संग्राम केला । रणामाजि तो मुख्य शत्रू निमाला ।। १०६ ॥" दहावे शती शोक अंत:पुराचा । प्रसंगें महोत्साव बीभीषणाचा ।। रघूनायके जानकी आणवीली । समस्तां सरां राघवा भेटि जाली ॥ १०७ ।। शती ऐक एकादशी राघवाची । असंभाव्य ते स्तूति ब्रह्मादिकांची ।। महापुष्पकारूढ होऊनि गेले । पढें भ्रातया भेटले स्वस्थ जाले ॥ १०८ ॥ पुढे द्वादशी मंदिरे त्या विरांची । यथायोग्य माने समस्तां जणांची ।। पुजा भोजने सांग सांसि जाली । पुरी वर्णितां मानसे ती निवाली ।। १०९॥ शती अष्टपंची पुरीमाज गेले । रघुराज भद्रासनी बैसवीले ॥ महोत्साव उत्साव नाना परीचा । समदाय तो बोळवीला कपींचा ।। ११० ॥ करी राज्य तो राम नाना विलासी । जनामाजि उपासना रामदासी ।। यथासांग तेरा शते श्लोक जाले । गुणी ऐकतां सर्व सूखे निवाले* ।। १११ ।। ॥ इति श्री रामदासकृत श्लोकबद्ध युद्धकांड संपूर्ण ।।" ७३. अष्टपंची शर्ती तेराव्या शतकांत.

  • १ बालकांड, २ अयोध्याकांड, ३ अरण्यकांड, ४ किष्किंधाकांड, ५ सुं-

दरकांड, ६ युद्वकांड, ७ व उत्तरकांड या सप्तकांडांतील आम्हांस मिळालेल्या तीन कांडांपैकी दोन कां. आज संपली. राहिलेल्या किष्किंधाकांडास प्रारंभ १०५ पृष्ठावर करूं. सर्व रामायण स्वामींनी रचिले असावे असे महिपतीच्या पुढील लेखावरून दिसते-- गुरू-गीता आणि पंचकरण । मनाचे श्लोक संपूर्ण | Frual श्लोकबद्ध रामायण | राय लिहून घेतले ॥ ५८ ॥ संतविजय-अ० १४वा. ह्यास्तव आमच्या शोधक मित्रांहीं बाकीची चार कांडे मिळवून आमच्याकडे पाठविण्याची तसदी घ्यावी म्हणजे स्वामींची आणखी सेवा आमचे हातून होईल. महिपतीच्या पुढील लेखावरून स्वामीनी हनमंतरामायणही प्राकृतांत केले होतें असे वाटतेः-- हनुमंताचे काव्य जाण । केले नाटक रामायण || ते सकळ मुखोद्गत पुराण | मारुती आपण गातसे ॥ ९७| मारुती-मुखींचे चरित्र नित्य । ते शमदास श्रवण करीत ॥ali त्याचे श्लोक करूनि प्राकृत । कीर्तनी गात निज प्रेमे ।। ९९ ॥ ATMEसंतविजय-अध्याय २रा ह्या मतास बळकटी येण्याचे असे कारण आहे की, जी कांडे आम्ही प्रसिद्ध