पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०२) श्रीरामदासकृत असो जाणत्याला कळे सर्व कांहीं । जनी नेणता त्यासि काहीच नाहीं ।। नसे ज्ञान त्या सर्व ही व्यर्थ गेले । जळो पंच भौक्तीक हे काय जालें ।। ९१ ।। असो ही कया बोलिली राघवाची । जनी सर्वदा ऐकती धन्य त्यांची ।। सखे ऐकतां ते महा दोष जाती । दुखे नाशती लोक ते धन्य होती ।। ९२ ।। चरित्रे बरी उत्तमे राघवाची । असंभाव्य विस्तारली पावनाची । कितीएक ते पाहती कोटि होती । जनी एक एकाक्षरे दोष जाती ।। ९३ ॥ शतांचीं शतें पूर्ण आरंभ संधी | कळाया कथा हेतु संकेत सिद्धि ।। पढ़ें बोलिले ते बरे वीवरावे । बजायास हे गद्य पोटी धरावें ॥ १४ ॥ मुळारंभ ते स्तूति नाना परीची । गिरी वर्णिला जाहली सागराची ॥ पहीले शती भेटि बीभीषणाची | पुढे शेवटी शेज दर्भासनाची ।। ९५ ॥ द्वितीयों शती राम कोधासि आला | कथेलागि तेथूनि आरंभ झाला ॥ बळे सिंधु पालाणिला शूक गेला । अपेक्षा मनी शंग पहावयाला ।। ९६ ॥ तृतियों शती शंग पाहो निघाले । रिपूलागि तो शिष्ट जावूनि बोले । बहू वीर राक्षेस युद्धी निमाले | कपी सर्वही नागपाशी निजेल ॥ ९७ ॥ रणे दाखवीली तये जानकीला । तये वीरशी तो* प्रहस्तू निमाला ।। प्रसंगें चि मंदोदरी नीति सांगे । निघाला दशग्रीव तो लागवेगे || ९८॥ चतुर्थी शी युद्ध त्या रावणाने । रघनायके सोडिला जीवदाने ।। पुढें कुंभकर्णामि संहार केला । समूदाय तो कूमरांचा निमाला ।। ९९॥ कितीएक ते वीर माहोदरेशी । प्रतापे रणामाजि ते प्रेतराशी ।। पुढे इंद्रजीते कपी भग्न केले । महावीर ते वाणमाळी निमाले ॥ १० ॥ शता पंचमा लागि आरंभ जाला । कपी वीर द्रोणाचळालागि गेला ॥ महावीर ते ऊठले स्वस्थजाले । त्रिकूटाचळू सर्व जाळं निघाले ।। १०१ ॥ कपी क्षोभले काळ युद्धा निघाले । कितीएक राक्षेस युद्धी निमाले । नभीहूनि तो रावणी वीर आला । समस्तांसि भेदूनिया शीघ्र गेला ॥ १०२ ॥ सहावे शती रावण दुःख सांगे। त्रिकूटाचळी रावणी लागवेगें ॥ पुन्हा इंद्रजीतू रणामाजि आला । विरी वानरी होम तो भग्न केला ॥ १०३ ।। शती सातवे त्या विरे इंद्रजीते । असंभाव्य केली रणामाजि प्रेते ।। सुमित्रासुते मारिला बाणघाते । यथासांग तो वान्ह सुलोचनेते ।। १०४ ॥ शती आठवे वीर घायाळ जाले । कितीएक राक्षेस युद्धी निमाले ।। सुमित्रासुता रावणे घात केला । गिरी द्रोण आणनियां स्वस्थ जाला ।। १०५ ॥ नवामाजि रामास सौमित्र सांगे । बळे भंगिला होम तो लागवेगें ।।

  • तृतीय विरेशी 'पा० मे.. ७२. रावणी इंद्रजित.