पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (१०१) दयाळासि तोही नमस्कार केले । प्रभू सव्य घालाने तैसे निघाले | समस्ती समस्तांसि वंदूनि वेगी । पुढे नीघते जहाले ते प्रसंगी ।। ७५ ॥ मने वीकले भक्तपाळे भुपाळे । मनामाज ते खंति केली दयाळे ।। जनी सेवकांलागि देखोनि ऊणे । बहू कष्ट घेऊनियां सौख्य देणे ॥ ७६ ॥ मनी भावना भक्तलोकासि जैशी। तया सारिखी देवरायासि तैशी ।। जनी सेवका कारणे जन्म घेणे । महद्भाग्य सांडोनिया नीच होणे ।। ७७ ।। पडे सांकडे सर्वदां सेवकांचें । दिनानाय हे ब्रीद विख्यात साचे ।। मनामाजि ते जैशिंजशी अपेक्षा । करीना कदा राम त्याची उपेक्षा ।। ७८ ॥ असंभाव्य अन्याय तो आठवीना । बह चूकतां देव काही शिणना ।।। तया मानसीं लागली प्रमे माया । करी सेवकालागि नाना उपाया ।। ७९ ॥ सदा सर्वदा देव हा साभिमानी। कृपा भाकिता शीघ्र पावे निदानी ॥ तया अंतरी थोर लाहान नाहीं । परी पाविजे दृढ भावार्थ काही ||८० ॥ नया अंतरीं भाव होईल जैसा। तयालागि तो देव पावेल तैसा ।। यदर्थी कदां संशयो ही असेना । अभावे तरी देव तो पालटेना ।। ८१ ।। किती एक अन्याय कोटयानुकोटी । भ्रमें होय नानापरी बुद्धि खोटी ॥ परी पहातां लोभ त्याचा सरेना । कृपासागर तो कदां वोसरेना ।। । कृपाळूपणे देव राजादि राजे । शिरी वाहिजे सर्व ही भक्तंवोझे। ननी दास दखोनियां दैन्ययाणा । मनामाजि वोसावतो देवराणा ।। ८३ ।। बहूसाल हे बोलणे काय कीती । स्वये जाणिजे ज्या अस स्वप्रचीती ।। अयोध्यापुरीमाजि तो रामराजा । कृपाळ सखे राहिला भक्तकाजा ।। ८४॥ कपी रीस गेले स्थळे जेयजेथे । प्रिती मारुती राहिला राम तेयें । रघूनाथ सीता तया बंधवर्गी । उभे राहिजे सेवके पूर्वभागीं ॥ ८५॥ समस्तांसि पूजानि नाना विलासे । नमस्कारिले सर्व दासानुदासे || उदासीन श्रोती कदां ही न कीजे । बह भेद भाषा क्षमा सर्व कीजे ।। ८६ ॥ मनामाजि ऊपासना रामध्यानी । जनी दासतो नीववी ब्रह्मज्ञानी।" अखंडीत त्या राघवाच्या प्रता। विवेके विचारे समाधान सोचे ।। ८७ ।। पदी लागतां निर्गुणी भक्त जाले । बह संगनीसंग होऊनि गेले ।। विवके बरे पहातां ध्येय ध्याता । विचारे बरें शोधितां ज्ञेय ज्ञाता ॥ ८॥ विवंचूनि तो साधक साध्य जाला । असंभाव्य तो ब्रह्मबोधे बुडाला ।। पसावे कळेना तरी सज्जनाला धरूनी त्यजावे विदेही पणाला ।। ८९॥ असे हें जनी प्राप्त तेणे धरावें | अनिर्वाच्य ते वाच्य कैसे वदावे ॥ सदां नित्य नीरूपणी वीवरावें । नुरावे परी कीर्तिरूपे उरावे ॥ ९० ॥